Winter Session 2022 : हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला सुरुवात

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरू होणार असून, १० डिसेंबरला सुरक्षारक्षकांसह काही कर्मचारी मुंबईतून नागपूरला दाखल होतील. तर उर्वरित सर्व कर्मचारी १४ डिसेंबरला येणार आहेत.
Maharashtra winter Session 2022
Maharashtra winter Session 2022

नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2022) १९ डिसेंबरपासून सुरू होणार असून, १० डिसेंबरला सुरक्षारक्षकांसह काही कर्मचारी मुंबईतून नागपूरला दाखल होतील. तर उर्वरित सर्व कर्मचारी १४ डिसेंबरला येणार आहेत.

दोन वर्षांनंतर अधिवेशन होत आहे. अधिवेशनासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली असून, या वर्षी खर्चात वाढ होणार आहे. प्रशासनाचा ९५ कोटींच्‍या खर्चाचा आराखडा तयार आहे. तयारीचा आढावा घेण्यासाठी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरसह विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत इतर पदाधिकारी, अधिकारी १५ नोव्हेंबरला येणार आहेत.

Maharashtra winter Session 2022
Crop Insurance : आदित्य ठाकरे यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट

अधिवेशनासाठी विविध विभागांतील अधिकाऱ्यांची ड्यूटी लागणार आहे. अधिवेशनानिमित्त १० हजारांवर अधिकारी, कर्मचारी नागपुरात येण्याची शक्यता आहे. त्यांच्या राहण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे. मंत्री, आमदार, सचिव येणार असल्याने त्यांच्यासाठी रविभवन, नागभवन, आमदार निवास, १६० गाळे तयार करण्यात आले आहेत.

तारीख बदलण्याची शक्यता

अधिवेशनाची तारीख १९ डिसेंबर निश्‍चित करण्यात आली आहे. गुजरातच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जात आहे. राज्यातील भाजपचे अनेक मंत्री, वरिष्ठ नेते गुजरातला प्रचारासाठी जाण्याची शक्यता आहे. शिवाय अधिवेशन तीन आठवडे चालविण्यासाठी भाजपचे काही नेते आग्रही आहेत. त्यामुळे अधिवेशन तारखेत बदल होण्याची चर्चा आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com