Devendra Fadnavis Latest News : राज्याचा टंचाई आराखडा तयार करा : फडणवीस

शेतकऱ्यांच्या जमिनी जलसमृद्ध करून देणाऱ्या ‘जलयुक्त शिवार’ अभियानाचा टप्पा दोन सुरू करण्यात आला आहे. त्यातून पाच हजार गावे जलसमृद्ध होतील.
Devendra Fadnvis
Devendra FadnvisAgrowon

Pune News : “सिंचन, कृषी उत्पादकता वाढीसह जलसमृद्धीसाठी उत्तम पर्याय असलेले ‘जलयुक्त शिवार’ अभियान (Jalyukt Shiwar Scheme) जनसहभागातून व्यापक प्रमाणात यशस्वी करावे. तसेच येत्या काळात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी सर्वंकष टंचाई आराखडा तयार करावा,’’ अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devedra Fadnavis) यांनी दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृह येथे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची एक दिवसीय परिषद सोमवारी (ता.२४) झाली. समारोपप्रसंगी श्री. फडणवीस बोलत होते. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,

Devendra Fadnvis
Water Shortage : उन्हाच्या झळा वाढल्याने सांगलीत पाणीटंचाई

सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या जमिनी जलसमृद्ध करून देणाऱ्या ‘जलयुक्त शिवार’ अभियानाचा टप्पा दोन सुरू करण्यात आला आहे. त्यातून पाच हजार गावे जलसमृद्ध होतील. राज्यामध्ये यापूर्वी जलयुक्त शिवार अभियानाची लोकसहभागातून प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे.

Devendra Fadnvis
Water Shortage : टंचाई निवारणार्थ गिरणा, अनेरमधून आवर्तनाची गरज

जलसिंचनाच्या वृद्धीसाठी हे उपयुक्त अभियान आहे. त्याच्या दुसऱ्या टप्प्यात विविध जलस्रोतांचे बळकटीकरण करावे. यापूर्वी केलेल्या कामांची आवश्यकतेनुसार दुरुस्ती करून नवीन कामे करावीत.

त्यासोबतच गाळमुक्त धरण उपक्रमाची अंमलबजावणी करावी. सक्रिय लोकसहभागासह संबंधित विभागांच्या सहकार्याने अभियान यशस्वीपणे राबवावे. जलसंपदाकडील यंत्रसामग्रीचा यासाठी उपयोग करून घ्यावा.’’

‘चारा छावण्यांचे नियोजन करा’

‘‘येत्या काळातील पावसाची अनियमितता लक्षात घेऊन चारा छावण्यांचे आतापासूनच नियोजन करावे. वैरण विकास कार्यक्रम राबवावा. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी नियोजन करून विनाखंड पिण्यासाठीचे तसेच सिंचनासाठी पाणीसाठा उपलब्ध करण्यावर भर द्यावा’’, अशा सूचना फडणवीस यांनी संबंधित विभागांना दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com