Rain Update : पाच जिल्ह्यांत पावसाची हजेरी कायम

धुमाकूळ घालणाऱ्या परतीच्या पावसाचा जोर बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांत कमी झाला.
Rain Update Marathwada
Rain Update MarathwadaAgrowon

औरंगाबाद : धुमाकूळ घालणाऱ्या परतीच्या पावसाचा जोर (Rain Intensity) बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांत कमी झाला. परंतु अनेक मंडलांत तुरळक, हलकी तर काही मंडलांत मध्यम ते दमदार पावसाची हजेरी (Rainfall Marathwada) कायम राहिली. जालना जिल्ह्यातील केदारखेडा मंडलाला अतिवृष्टीचा (Heavy Rain) दणका बसला.

Rain Update Marathwada
Crop Insurance : पिकांचे पंचनामे करा

नेमका सोयाबीन काढण्याच्या हंगामात आलेल्या परतीच्या पावसाने सर्वाधिक क्षेत्रावर पेरल्या गेलेल्या या पिकाची वाताहत सुरू केली आहे. भाग बदलून व काही क्षणात अतिजोरदार पडत असलेल्या या पावसामुळे आपल्या पिकांचे रक्षण करण्याची संधीही शेतकऱ्यांना मिळत नसल्याची स्थिती आहे.

Rain Update Marathwada
Crop Damage : पावसाचे द्राक्ष बागांवर ग्रहण

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी २९ मंडलांत तुरळक ते हलका पाऊस झाला. जिल्ह्यातील आमठाणा मंडलात ४८.८ मिलिमीटर तर निल्लोड मंडलात ४१.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्या पाठोपाठ वडोद बाजार मंडलात २०.८ तर आळंद मंडलातही २०.८ मिलिमीटर पाऊस झाला.

इतर मंडलात मात्र पावसाची हजेरी तुरळक ते हलक्या स्वरूपाचीच राहिली. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ३७ मंडलांत पावसाची हजेरी लागली. जिल्ह्यातील केदारखेडा मंडलात ८० मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली. सिपोरा मंडलात ३०.८ मिलिमीटर पाऊस वगळता इतर मंडलात तुरळक ते हलक्या स्वरूपाची हजेरी राहिली.

बीड जिल्ह्यातील बहुतांश मंडलात पावसाने उसंत घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्यातील २७ मंडलांत तुरळक पाऊस झाला. लोखंडी सावरगाव मंडलात २९.८ मिलिमीटर झालेला पाऊस सर्वाधिक राहिला. त्या पाठोपाठ पाटोदा मंडलात २३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यातील उजनी मंडलात सर्वाधिक ५२.३ मिलिमीटर पाऊस झाला.

जिल्ह्यातील ६० पैकी जवळपास ३२ मंडलांत तुरळक ते हलक्या पावसाचे नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी २९ मंडलांत तुरळक ते हलका पाऊस झाला. जिल्ह्यातील वालवड मंडलात सर्वाधिक ४२.३, तर त्या पाठोपाठ ईट मंडलात २६.५ मिलिमीटर पाऊस झाला.

उघड्या डोळ्यादेखत पिकांची नासाडी पाहिली जात नाही. खरीप हंगामात उत्पन्नाचे स्वप्न अखेर पाण्यात गेले आहे. परतीचा पाऊस थांबण्याचे नाव घेईना. सोयाबीन, कपाशी, बाजरी, तूर, मक्यासह आदी पिकांची फळबागा, भाजीपाला, फुलशेती यांची होत असलेली नासाडी होते आहे. सरकारने शेतकऱ्याचा अंत पाहू नये, नुकसान भरपाई तत्काळ द्यावी.
केदार राऊत, शेतकरी मार्डी, ता. अंबड, जि. जालना

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com