
बांबवडे, जि. कोल्हापूर ः जन्मानंतर आईचे दूध (Mother Milk) जगवते, तर त्यानंतर माती मनुष्याला जगवते. अन्नधान्य, फळे (Fruit), दूध हे निसर्गनिर्मित असते. मातीचे (Soil) अस्तित्व जपण्याची वेळ आली आहे. म्हणून मातीची काळजी (Soil Care) आईसारखीच घ्यायला हवी, असे प्रतिपादन मृदा तज्ज्ञ बाबासाहेब जगताप यांनी केले.
प्राकृतिक शेती व गोसंवर्धन संस्था, डोणोली यांच्या वतीने झालेल्या डोणोली (ता. शाहूवाडी) येथील शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष अशोक परीट अध्यक्षस्थानी होते.
जगताप म्हणाले, ‘मृदा संवर्धनाचे काम शेतकऱ्यांनाच करावे लागेल. पालापाचोळा, स्वतः नैसर्गिक तयार केलेल्या जैविक खतांचा वापर करायला हवा. वर्षातील काही काळ मातीला विश्रांतीची गरज आहे.
बाराही महिने पीक घेऊन तिचे आरोग्य बिघडू देऊ नका.’ या वेळी उत्तम गुरव, अविनाश पाटील, विजय पाटील, अनंत खोचरे, शिवाजी गराडेंसह दहा ते बारा गावांतील ७० ते ८० शेतकरी उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. संजय मगदूम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर सचिव अमर पाटील यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.