राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सोमवारी शपथविधी

देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर निवड झालेल्या मुर्मू या सर्वांत तरुण राष्ट्रपती (६४ वर्षे एक महिना आणि आठ दिवस) ठरल्या आहेत. त्या पहिल्या आदिवासी व दुसऱ्या महिला राष्ट्रपतीही ठरल्या आहेत.
Draupadi Murmu
Draupadi MurmuAgrowon

नवी दिल्ली : भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचा अपेक्षेप्रमाणे दणदणीत विजय झाला. त्यांना एकूण मतांच्या ६४ टक्के, तर ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना ३६ टक्के मते मिळाली. सरन्यायाधीश सोमवारी (ता. २५) मुर्मू यांना पद व गोपनीयतेची शपथ (Swearing Ceremony) देतील.

देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर निवड झालेल्या मुर्मू या सर्वांत तरुण राष्ट्रपती (६४ वर्षे एक महिना आणि आठ दिवस) ठरल्या आहेत. त्या पहिल्या आदिवासी व दुसऱ्या महिला राष्ट्रपतीही ठरल्या आहेत. अनेक भाजपविरोधी पक्षांनीही पाठिंबा दिल्याने उमेदवारी जाहीर होताच मुर्मू यांचा विजय अपेक्षितच मानला जात होता आणि गुरुवारी (ता. २१) त्यावर शिक्कामोर्तब झाले. राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी यांनी मुर्मू यांच्या निवडीची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह वरिष्ठ मंत्री व एनडीएतील पक्षनेते यांनी मुर्मू यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.

Draupadi Murmu
द्रौपदी मुर्मू ऐतिहासिक विजयाकडे‘

राष्ट्रपतिपदासाठी १८ रोजी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी गुरुवारी झाली. ७७६ खासदार व ४०३३ आमदार असे एकूण ४८०९ मतदार होते. त्यापैकी ४७५४ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी ४७०१ मते वैध ठरली, तर ५३ मते अवैध ठरली. यापैकी मुर्मू यांना २८२४ मते मिळाली त्यांचे एकत्रित मतमूल्य ६७६८०३ एवढे आहे. तर यशवंत सिन्हा यांना १८७७ मते मिळाली. त्यांचे एकत्रित मतमूल्य ३८०१७७ एवढे आहे.

Draupadi Murmu
द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुर्मू यांना मिळालेल्या मतदानामध्ये विरोधी पक्षांच्या खासदार आणि आमदारांची संख्या लक्षणीय आहे. प्रारंभिक आकडेवारीनुसार किमान १७ खासदार आणि किमान १२५ आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ करून मुर्मू यांच्या बाजूने कौल दिला. आसाम, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील आमदारांची संख्या सर्वांत जास्त होती. आसाममधील २२, मध्य प्रदेशातील २० आमदारांनी क्रॉस व्होटिंग करून मुर्मू यांच्या पारड्यात मत टाकल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. बिहार आणि छत्तीसगडमधील विरोधी पक्षांच्या प्रत्येकी चार, गोव्यातील चार आणि गुजरातमधील दहा आमदारांनीही मुर्मू यांना मते दिल्याचे दिसून येते. आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आणि विरोधी तेलुगू देशमच्या सर्व आमदारांनी मुर्मू यांना मतदान केले. दुसरीकडे यशवंत सिन्हा यांना केरळमधील सर्व आमदारांची मते मिळाली.

निवासस्थानाबाहेर जल्लोष

विजय स्पष्ट होताच द्रौपदी मुर्मू यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर एकच जल्लोष सुरू झाला. भाजपने दिल्लीच्या विविध भागांतही जल्लोष केला. आसाम, मिझोराम, नागालँड आदी राज्यांमधून आलेली आदिवासी कलापथके दिल्लीच्या मुख्य भागांतील चौकाचौकांत भाजपने बनवलेल्या विशेष व्यासपीठांवर नृत्य करू लागली. भाजपने या निमित्ताने एक अभिनंदन यात्राही आयोजित केली होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com