पंतप्रधान १४ जूनला देहू दौऱ्यावर

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी १४ जून रोजी पंतप्रधान देहूमध्ये येणार आहेत.
पंतप्रधान १४ जूनला देहू दौऱ्यावर
Modi In DehuAgrowon

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या (Sant Tukaram) शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी १४ जून रोजी पंतप्रधान देहूमध्ये येणार आहेत. देशाचे पंतप्रधान पहिल्यांदाच देहूमध्ये (Dehu) येणार असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी देहू संस्थान आणि पोलीस प्रशासन जय्यत तयारी करत आहे.

देहू संस्थानाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी खास वारकरी पद्धतीची पगडी तयार करण्यात आली आहे. पुण्यातील मुरुडकर फेटेवाले यांच्याकडून ही पगडी तयार करण्यात आलीय. या पगडीवर तुकाराम महाराजांचा "भले तरी देऊ कासेंची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी" असा अभंगही लिहिलेला आहे. या पगडीसोबतच मोदी यांना उपरणे देण्यात येणार आहे. त्यावरही मराठी आणि हिंदी भाषेत अभंग लिहिले जाणार आहेत.

या पगडीबद्दल बोलताना गिरीश मुरुडकर म्हणाले, "आजवर अनेक राजकीय, सामाजिक क्रीडा आणि कला क्षेत्रातील मान्यवर मंडळीसाठी आम्ही पगडी आणि फेटे तयार केले आहेत. पंतप्रधान १४ जूनला देहू दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे देहू संस्थानकडून पंतप्रधानांसाठी पगडी आणि उपरणे तयार करण्यात यावे, असे सांगण्यात आले होते. मागील चार दिवसापासून आम्ही पगडी आणि उपरणे तयार करीत आहोत."

या पगडी आणि उपरण्यासाठी वेगळे कापड वापरण्यात आले आहे. या पगडीच्या वरच्या बाजूला तुळशीची माळ, चिपळी टाळ आणि एका बाजूला संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या छोट्या आकाराच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही दिवसांपूर्वी देहू संस्थानाच्या विश्वस्तांसह आचार्य तुषार भोसले यांनी देहू भेटीचे आमंत्रण दिले होते. मोदी यांनी हे आमंत्रण स्वीकारले असून १४ जूनला पंतप्रधान देहूत येणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com