Bharat Jodo Yatra : पंतप्रधानांची नीती भारत तोडण्याची

खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत कॉंग्रेसचे समर्थक, टीकाकार आणि त्रयस्त देखील सहभागी होत आहेत.
Bharat Jodo Yatra
Bharat Jodo YatraAgrowon

नांदेड : खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ (Bharat Jodo Yatra) यात्रेत कॉंग्रेसचे समर्थक, टीकाकार आणि त्रयस्त देखील सहभागी होत आहेत. ही यात्रा ‘मन की बात’ नसून ‘जन की बात’ आहे. पंतप्रधान यांची नियत आणि नीती भारत तोडण्याची आहे, त्याला आम्ही जोडण्याचे काम करत आहोत, अशी सडकून टीका माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी केली. नायगाव येथे पत्रकार परिषदेत बुधवारी (ता. ९) ते बोलत होते.

Bharat Jodo Yatra
Fodder Crop : फक्त चाऱ्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन होणार

जयराम रमेश म्हणाले, ‘‘भारत तीन पातळ्यांवर तोडण्याचे काम सुरू आहे. त्यात पहिले आर्थिक विषमता आहे. महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीद्वारे ते साध्य करत आहेत. दुसरे भारताला कमजोर करण्यासाठी ध्रुवीकरणाचे राजकारण खेळले जात असून जाती, भाषेवर विभागणी केली जात आहे. तिसरे म्हणजे, राजकीय तानाशाही सुरू आहे.

संविधानिक संस्थांचे खच्चीकरण करून सगळे अधिकार पंतप्रधान कार्यालयाकडे ठेवले आहेत.’’ यात्रेवर भाजपकडून रोज टीका होतेय. ट्विटर खाते बंद करण्याचे प्रयत्न झाले. पहिल्यांदाच कॉंग्रेस इतकी आक्रमक झाली आहे, हे पाहून भाजप घाबरली आहे.

Summary

कॉंग्रेस फुटणार ही अफवा ः नाना पटोले

यात्रेचा प्रतिसाद पाहून भाजप बिथरली आहे. म्हणून कॉंग्रेस फुटणार. यात्रेसाठी भ्रष्टाचाराचा पैसा वापरत आहेत, अशा अफवा पसरवत आहेत.

Bharat Jodo Yatra
Crop Insurance : आदित्य ठाकरे यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट

कडाक्याच्या थंडीतही उत्साह

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा बुधवारी (ता. नऊ) महाराष्ट्रातील तिसरा दिवस होता. यात्रेचे पहिले सत्र सकाळी सहाला शंकरनगर येथून सुरू झाले. दरम्यान, पहाटे पाच वाजतापासून कडाक्याच्या थंडीतही हजारो कार्यकर्ते, नागरिक यांनी गर्दी केली होती. लेझीम पथक, शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गायन यामुळे यात्रेत मोठा उत्साह दिसून आला.

यात्रेला लोकचळवळीचे स्वरूप ः अशोक चव्हाण

यात्रेला लोक चळवळीचे स्वरूप आले आहे. भय, घृणा यावर मात करत एकोपा, लोकशाही मजबूत करण्यासाठी ही चळवळ आहे. याद्वारे लोकांच्या प्रश्नांना थेट वाचा फोडली जात आहे. गुरुवारी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे आदी तर, शुक्रवारी आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com