Turmeric Market : हिंगोलीत १ लाख ७० हजार क्विंटल हळदीची खरेदी

सरासरी ६६०८ रुपये दर; खरेदीदारांअभावी बुधवारपर्यंत खरेदी बंद
Turmeric Market
Turmeric MarketAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार (Hingoli APMC) समितीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये (Turmeric Market) चालू आर्थिक वर्षात १ एप्रि २०२२ ते १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत एकूण १ लाख ७० हजार ५६८ क्विंटल हळदीची खरेदी झाली.

प्रति क्विंटल सरासरी ६६०८ रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. सध्या खरेदीदार नसल्यामुळे संत नामदेव हळद मार्केटमधील खरेदी मंगळवारपासून (ता. १४) तात्पुरती बंद करण्यात आली आहे. बुधवारपासून (ता. २२) हळद खरेदी सुरू होईल.

संत नामेदव हळद मार्केटमध्ये हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वाशीम, अमरावती, बुलडाणा आदी जिल्ह्यांतून हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक होते.

त्यामुळे आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार हे तीन दिवस हळदीची आवक घेऊन जाहीर लिलावद्वारे खरेदी केली जाते. चालू आर्थिक वर्षात १ एप्रिलपासून मंगळवारपर्यंत (ता. १४) हळदीची एकूण १ लाख ७० हजार ५६८ क्विंटल आवक झाली.

प्रति क्विटल सरासरी ६६०८ रुपये द मिळाले. एप्रिलमध्ये सर्वाधिक प्रति क्विंटल सरासरी ७२९० रुपये, तर ऑक्टोबरमध्ये सर्वांत कमी प्रति क्विंटल सरासरी ६१७४ रुपये दर मिळाले. यंदाच्या हंगामातील नवीन हळदीची आवक सुरू झाली आहे. नवीन हळदीला प्रति क्विंटल सरासरी ६६०० रुपये दर मिळाले, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

संत नामदेव हळद मार्केट २०२२-२३ आवक व सरासरी भाव
महिना...आवक क्विंटल...सरासरी भाव
एप्रिल...१६०५९...७२९०
मे...२०६३०...६७७७
जून...१६९४५...६६६९
जुलै...२१८३०...६६४९
ऑगस्ट...९६८५...६४९२
सप्टेंबर...१४४५४...६३१७
ऑक्टोबर...९२३५...६१७४
नोव्हेंबर...१६०९४...६६५०
डिसेंबर...१६५३५...६६८४
जानेवारी...१८८४६....६५३६
फेब्रुवारी (१४ पर्यंत)...१०२५५...६४५२

Turmeric Market
परभणी, हिंगोलीत २० हजार क्विंटल हरभरा खरेदी 

प्रतिक्रिया
यंदाच्या हंगामातील नवीन हळदीची आवक सुरू झाली. गतवर्षीच्या हळदीचा साठा आहे. सध्या खरेदीदार नसल्यामुळे हळद खरेदी तात्पुरती बंद आहे. पुढील बुधवारपासून खरेदी सुरू होईल.
- नारायण पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com