
जळगाव : जिल्ह्यात राष्ट्रीय सुरक्षा अन्नधान्य अंतर्गत (National Food Security) जिल्हास्तरावरून भरड धान्याच्या खरेदीसाठी (Millet Procurement) जिल्ह्यात १८ केंद्रांना मान्यता दिली आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत (Procurement Scheme) आतापर्यंत सुमारे दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाइनद्वारे भरडधान्य खरेदीसाठी नोंदणी केली आहे. आतापर्यंत ३ हजार ८९६ क्विंटल भरडधान्याची तीन केंद्रांवर खरेदी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२-२३ अंतर्गत भरडधान्य खरेदीसाठी ऑक्टोबरअखेर नोंदणीस सुरुवात झाली.
त्यानुसार १८०० शेतकऱ्यांनी ज्वारी, मका २४७, बाजरीसाठी ६, असे एकूण २०४७ शेतकऱ्यांनी जिल्हाभरात तालुका स्तरावर असलेल्या केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी केली होती.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार भरडधान्य खरेदी केंद्रांना वेळोवेळी मुदतवाढ दिली होती. २१ डिसेंबर नुसार शेवटची मुदतवाढ ३१ डिसेंबर पर्यंत होती. त्यानुसार जिल्ह्यातील तीन केंद्रांवर भरडधान्य खरेदी सुरू झाली. आतापर्यंत ३ हजार ८९६ क्विंटल भरडधान्याची खरेदी करण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.