Fertilizer Production : पाचट न जाळता खत तयार करा

उसाचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी विविध शेतकरी सेंद्रिय खताचा वापर करीत असून ऊस तोडल्यानंतर पाचट न जाळता या पाचटापासून कुट्टीयंत्राच्या साहाय्याने कुटी करून खत तयार केले जात आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon

कुंभार पिंपळगाव, जि जालना : उसाचे एकरी उत्पादन (Sugarcane Cultivation) वाढवण्यासाठी विविध शेतकरी सेंद्रिय खताचा (Organic Fertilizer) वापर करीत असून ऊस तोडल्यानंतर पाचट (Sugarcane Residue) न जाळता या पाचटापासून कुट्टीयंत्राच्या साहाय्याने कुटी करून खत तयार केले जात आहे. कारखान्याच्या वतीने यासाठी शेतकऱ्यांना शेतावर जाऊन प्रात्यक्षिक करून दाखवल्या जात आहे.

Fertilizer
Fertilizer : पुण्यासाठी रासायनिक खते उपलब्ध

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी खोडवा किंवा लागवड उसाचे तोडणी झाल्यानंतर पाचट जाळू नये, कुटी यंत्राच्या साहाय्याने कुटी करून पाचट कुजवणाऱ्या जिवाणूंचा वापर करून पाचट जाग्यावर कुजवावे, यामुळे विनाखर्च एकरी चार ते पाच टन सेंद्रिय खत ऊस पिकासाठी उपलब्ध होते.

दिवसेंदिवस वाढणारा रासायनिक खतांचा खर्च पाहता शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. यासोबतच कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याकडे उपलब्ध असणाऱ्या प्रेसमड, बायोअर्थ कंपोज,गांडुळ खत, समर्थ सेंद्रिय खत, समर्थ जैविक खत

तसेच वसंतदादा साखर संस्थेच्या ॲसेटो बॅक्‍टर, पीएसबी, केएसबी तसेच द्रवरूप एनपीके, द्रवरूप सूक्ष्म मूलद्रव्ये,वसंत ऊर्जा यासारखी वाढ संप्रेरके, सॉईल हेल्थ, प्लॅनेट हेल्थ, ह्युमिक ॲसिड यासारख्या दर्जेदार उत्पादनांचा वापर करून एकरी खर्चात पन्नास टक्‍क्‍यापर्यंत बचत करावी व भरघोस उत्पादन घ्यावे, असे आवाहन समर्थ सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सर्जेराव वलटे यांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com