SMART Cotton : ‘स्मार्ट कॉटन’ मधून ११० गाठींचे उत्पादन

स्मार्ट कॉटन’अंतर्गत कापसापासून गाठी तयार करून शेतकऱ्यांमध्ये मूल्यवर्धनाचे कौशल्य रुजविले जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ११० गाठी तयार केल्या आहे.
Cotton
CottonAgrowon

अमरावती ः ‘स्मार्ट कॉटन’अंतर्गत (SMART Cotton) कापसापासून गाठी (Cotton Bales) तयार करून शेतकऱ्यांमध्ये मूल्यवर्धनाचे कौशल्य रुजविले जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ११० गाठी (Cotton Bales Production) तयार केल्या आहे. या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटलला रुईउतारा ३६.५१ टक्‍के मिळाला. हा पहिलाच प्रयत्न यशस्वी ठरल्याने शेतकऱ्यांचा उत्साह द्विगुणित आहे.

Cotton
Cotton Market : ‘स्मार्ट’अंतर्गत कापसापासून रुई निर्मिती प्रक्रियेस सुरुवात

शेतकऱ्यांमध्ये मूल्यवर्धन रुजावे याकरिता बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत लहान आणि सीमांत शेतकरी तसेच कृषी नव-उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून मूल्यसाखळीवर भर दिला जात आहे.

Cotton
Cotton Market : बाजारातील कापूस आवक कमीच

त्या अंतर्गत स्मार्ट कॉटन उपप्रकल्पाची अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर, वरुड, अमरावती, अचलपूर या चार तालुक्‍यांतील गावांमध्ये अंमलबजावणी होत आहे. स्मार्ट कॉटन प्रकल्पाच्या माध्यमातून एकजिनसी व स्वच्छ कापसाचे उत्पादन करून कापूस प्रक्रिया उद्योगाला मूल्यवर्धित कापूस उपलब्ध करून देणे, कापूस प्रक्रियेनंतर रुई आधारित विक्री व्यवस्थेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे, उत्पादित मूल्यवर्धित कापसाचा शेतकऱ्यांना अधिक मोबदला मिळवून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

Cotton
Cotton Rate : देशातील बाजारपेठेत आज कापसाचे दर स्थिर

अमरावती जिल्ह्यातील ५१ गावांनी स्मार्ट कॉटन प्रकल्पात सहभाग घेत. एकजिनसी वाणाची लागवड केली. जिनिंग प्रेसिंगची सुविधा असलेल्या ठिकाणापासून १५ किलोमीटर परिसरातील गावांची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली.

‘एक गाव एक वाण’ लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले. त्याआधारे दर्यापूर तालुक्‍यातील तोंगलाबाद गावातील शेतकऱ्यांनी एकूण ५०८ क्‍विंटल कापूस एकत्रित करून जिनिंग मिलचे माध्यमातून ११० गाठी तयार केल्या आहेत. यामध्ये त्यांना ३६.५१ टक्‍के रुई उतारा मिळाला आहे.

स्मार्ट कॉटन प्रकल्प महाकॉटन व कृषी विभाग यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात सहभागी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या एकजिनसी कापसाच्या गाठी तयार करून त्या ऑनलाइन पद्धतीने विकल्या जाणार आहेत. त्यातून मिळणारा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. त्यामुळे कापूस विक्रीतील मध्यस्थांची साखळी कमी होत शेतकऱ्यांना जादा पैसा मिळण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांना मूल्यवर्धनाविषयी माहिती व्हावी, असा या प्रकल्पाचा उद्देश आहे. ११० गाठी तयार करण्यात आल्या. यापुढील हंगामात प्रकल्पातील गावांमध्ये जास्त रुई उतारा असलेल्या वाणांच्या लागवडीवर भर दिला जाणार आहे. मूल्यवर्धनाच्या माध्यमातून अतिरिक्‍त नफा मिळवून देण्याचा प्रकल्पाचा उद्देश आहे.

- नीलेश राठोड, पुरवठा व मूल्यसाखळी तज्ज्ञ, स्मार्ट प्रकल्प, अमरावती

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com