Silk Production : पुणे जिल्ह्यात रेशीम कोषाचे २१८ टनाचे उत्पादन

कोष उत्पादन ४० टनांनी वाढले; २४१ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड
रेशीम कोष निर्मिती प्रक्रिया व उत्पादन
रेशीम कोष निर्मिती प्रक्रिया व उत्पादन

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : जिल्ह्यात २०२२-२३ या वर्षात तुती लागवडीसाठी (Tuti Cultivation) देण्यात आलेल्या २५० एकर लक्ष्यांकापैकी २४१ एकर क्षेत्रावर २२६ शेतकऱ्यांनी तुतीची लागवड केली आहे.

चालू वर्षात ३ लाख ९ हजार ४०० अंडीपुंजाच्या कीटक संगोपनापासून २१८ टन कोषांचे उत्पादन झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत अंडीपुंज संख्या ३३ हजार ८२५ संख्येने जास्त असून कोष उत्पादन ४० टनाने वाढले आहे.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अंडीपुंजाच्या अनुदानापोटी १३ लाख ३३ हजार ९१३ रुपये मंजूर झाले असून लाभार्थ्यांना रक्कम वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात १७५ अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे.

ही योजना ३ वर्षाच्या कालावधीसाठी असून विभागून एकरी रुपये ३ लाख ४२ हजार ९०० रुपये अनुदान देण्यात येते.

रेशीम कोष निर्मिती प्रक्रिया व उत्पादन
Silk Cocoon Market : वर्षभरात १३१ टनांवर रेशीम कोषांची खरेदी

शासनाने २०२३-२४ साठी २५० एकर तुती लागवडीचे लक्ष्यांक दिलेला आहे. आजअखेर ८४० शेतकऱ्यांनी ८४९ एकर क्षेत्राकरीता नाव नोंदणी केली आहे. चालू वर्षापासून सिल्क समग्र-२ योजनेतून शेतकऱ्यांकरीता तुती लागवड, किटक संगोपन गृह बांधणी, रेशीम धागा निर्मिती करता आणि बाल किटक संगोपन केंद्र उभारणी याकरिता अनुदान देण्यात येणार आहे.

यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा असणार आहे. सिल्क समग्र-१ योजनेअंतर्गत किटक संगोपन गृह उभारणीकरिता ५ शेतकऱ्यांना रुपये ६ लाख ३२ हजार ३९५ रुपयांचे अनुदान व किसान नर्सरीकरीता १ लाख ३५ हजार अनुदान मंजूर झाले असून त्याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.

रेशीम कोष निर्मिती प्रक्रिया व उत्पादन
Silk Cocoon Production : सांगलीत रेशीम कोष उत्पादनात होतेय वाढ

जिल्हा वार्षिक योजनेतून नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती येथे शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टिने रॉसिल्क सेंटरसाठी ५ लाख ३९ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.

त्यातून यंत्र उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. खेड तालुक्यातील दौंदे येथे खासगी स्तरावर बाल किटक संगोपन केंद्र (चॉकी) असून त्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २ अवस्था पूर्ण झालेले रेशीम किटकांचा (अळ्यांचा) पुरवठा केला जातो.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या कोष उत्पादनात वाढ झाली आहे. तसेच वार्षिक रेशीम पिकांची संख्या वाढण्यास मदत झाली आहे. त्या

माणे रेशीम अळ्यावरती येणाऱ्या रोगामुळे होणारे नुकसानीस आळा बसला आहे. जिल्ह्याबाहेरील शेतकरी बाल किटक संगोपन केंद्रातून अळ्या खरेदी करतात. पुणे जिल्ह्यात चालू वर्षी १ लाख ६७ हजार २०० अंडी पुज्यांची चॉकी वाटप करण्यात आली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती येथे रेशीम कोष बाजारपेठ तथा कोषपश्चात प्रक्रिया उद्योगास चालना मिळावी. तसेच चांगले रीलर्स व विव्हर्स तयार व्हावेत या उद्देशाने ‘रेशीम विकास कार्यक्रम पायाभूत सुविधा निर्मिती व अस्तित्वातील बळकटीकरण करण्यासाठी योजना’ अंतर्गत शासनाने ९ कोटी ५६लाख ६२ हजार रुपये मंजूर केलेले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर रेशीम उद्योगात चीन मागे पडला असून आपल्याला त्यामुळे मोठी संधी निर्माण झाली आहे. अर्थार्जनाच्या विविध मोठ्या संधी रेशीम उद्योगात असून अधिकाधिक जणांनी याचा फायदा घ्यावा.
संजय फुले, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, पुणे

रेशीम कोष निर्मिती प्रक्रिया व उत्पादन
Silk Production: रेशीम शेतीतून ‘लखपती शेतकरी’ होण्याचा मान

इनाम पद्धतीने ५१ हजार किलोची कोष खरेदी
राज्यात पहिल्यांदाच कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती येथे कृषी उत्पन्न बाजार समिती व रेशीम संचालनालयाच्या समन्वयाने इनाम पद्धतीने कोषांची खरेदी करण्यास सुरुवात झाली असून ५१ हजार ६२६ किलोग्राम कोषांची खरेदी या बाजारात झाली आहे.

याची किंमत २ कोटी ९६ लाख ९६ हजार ४९० रुपये आहे. भारतात ई-नाम पद्धतीने कोषांची खरेदी करणारा पुणे हा पहिलाच जिल्हा आहे. याठिकाणी शेतकऱ्यांच्या समोर कोष परीक्षण अहवाल तयार करून त्याच्या साहाय्याने ऑनलाइन लिलाव प्रक्रिया अवलंबिली जाते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com