Lumpy Skin Vaccine : लम्पी स्कीन’ लसीची राज्यात निर्मिती

मुख्यमंत्री शिंदे ः केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार
Lumpy Vaccine | Lumpy Skin Vaccine | Lumpy Skin Disease
Lumpy Vaccine | Lumpy Skin Vaccine | Lumpy Skin DiseaseAgrowon


ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः ‘‘महाराष्ट्र लम्पी स्कीन आजारावर (Lumpy Skin Disease) लस निर्मिती करणारे पहिले राज्य ठरणार आहे. राज्यात लस (Vaccine) निर्मितीमुळे पशुधनास लम्पी स्कीन आजार नियंत्रणासाठी लसीकरण नियमितपणे करणे शक्य होईल. त्यामुळे भविष्यात यासारख्या साथ रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले.

Lumpy Vaccine | Lumpy Skin Vaccine | Lumpy Skin Disease
Lumpy Skin Vaccine : ‘लम्पी स्कीन’वर हवी प्रभावी लस

‘लम्पी स्कीन’ प्रतिबंधात्मक लस निर्मिती तंत्रज्ञान बाबतचा केंद्र आणि राज्य सरकार दरम्यान हस्तांतरण सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.
या वेळी केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार विकास महात्मे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंग, भारतीय कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपमहासंचालक डॉ. भूपेंद्रनाथ त्रिपाठी आदि उपस्थित होते.

Lumpy Vaccine | Lumpy Skin Vaccine | Lumpy Skin Disease
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’वर लवकरच मोफत लसीची व्यवस्था

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘लम्पी स्कीन लस तंत्रज्ञान हस्तांतरण सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र यावरील लस निर्माण करणारे पहिले राज्य ठरणार आहे. ही लस ऑगस्ट २०२३ पर्यंत उपलब्ध होणार आहे. लस निर्मितीमुळे कमी कालावधीत या आजाराचे निर्मूलन होण्यास मदत होणार आहे. पशुपालक शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येणार आहे.’’ इतर राज्यांच्या मागणीनुसार लस उत्पादनाचे नियोजन करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याच्या विकासासाठी केंद्र शासन सर्व क्षेत्रांत मदत करीत आहे. पशुसंवर्धनाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लम्पी स्कीन’ लस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष लक्ष दिले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्र हिस्सार आणि भारतीय कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बरेली विभाग यांनी ‘लम्पी स्कीन’ प्रतिबंधात्मक लसीचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे. या लसीचे तंत्रज्ञान पुणे येथील पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था यांच्याकडे विकसित करण्यासाठी रुपये एक कोटी १८ लाख खर्च करण्यात येणार आहेत. औंध (पुणे) येथील पशुवैद्यकीय जैव पदार्थनिर्मितीसंस्थेच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत निर्माण केलेल्या विषाणू प्रयोगशाळेमध्ये आदर्श उत्पादन पद्धतीचा अवलंब करून लम्पी स्कीन नियंत्रणाचे लसीचे उत्पादन करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘लम्पी स्कीन आजारापासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी एक विशेष लस, ही काळाची गरज होती. लस केवळ जीविताच्या रक्षणाबरोबरच पशूंची उत्पादकता देखील निश्‍चित करेल.

विकसित केलेले ‘लम्पी स्कीन’ प्रतिबंधक लस तंत्रज्ञान भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे. हे लस तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी ‘आयसीएआर’ने केलेली कामगिरी प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी लस तंत्रज्ञान हस्तांतरण प्रसंगी केले.

पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील यांनी राज्यामध्ये पशू विज्ञान केंद्र स्थापन करण्याची केंद्र सरकारकडे विनंती केली. राज्यातील लम्पी स्कीन आजार निर्मूलनाकरिता लस साठा उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पशुसंवर्धन मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांचे आभार मानले. राज्यात लम्पी स्कीन नियंत्रणासाठी पशुधनाचे १०० टक्के लसीकरण झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येत आहे. वेळच्या वेळी अनेक निर्णय घेतल्याने राज्यात पशुधनाचे मृत्युचे प्रमाण इतर राज्याच्या तुलनेत कमी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com