कापसाऐवजी पॉलिस्टर कापडनिर्मिती वाढतेय

पॉलिस्टरच्या उत्पादनातील वाढही कापसापेक्षा जास्त आहे, असे एका अभ्यासातून पुढे आले आहे.
Production of polyester fabrics instead of cotton is on the rise
Production of polyester fabrics instead of cotton is on the riseAgrowon

पुणे ः कापूस पिकाचे (Cotton Crop) उत्पादन घेण्यामागे कापडनिर्मिती (Cloth Production) हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. कॉटनच्या कपड्यांना विशेष मागणी असते; मात्र जगभरातील एकूण कापड उत्पादनात पॉलिस्टर कापडाचे प्रमाण जास्त आहे. तर पॉलिस्टरच्या उत्पादनातील वाढही कापसापेक्षा जास्त आहे, असे एका अभ्यासातून पुढे आले आहे.

Production of polyester fabrics instead of cotton is on the rise
Cotton Production: कापूस उत्पादन यंदा ३७५ लाख गाठींवर पोचणार?

एका अहवालानुसार जगात २०१५ मध्ये २४० लाख टन कापसापासून निर्मित कापडाचे उत्पादन झाले होते. ते कापूस उत्पादन घटीमुळे २०२० मध्ये २२७ लाख टनांपर्यंत कमी झाले. या पाच वर्षांमध्ये कापूस पिकावर पाऊस आणि दुष्काळाचा परिणाम झाला. त्यामुळे जागतिक कापूस उत्पादन काहीसे कमी राहिले. २०२१ मध्ये कापसापासून निर्मित कापडाचे उत्पादन २६० लाख टनांवर पोहोचले. तर २०२५ पर्यंत या कापडाचे उत्पादन २७० लाख टनांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे.
कापसापासून निर्मित कापडाचे प्रमाण एकूण जागतिक कापड उत्पादनात २०१५ मध्ये २८.५७ टक्क्यांवर होते. ते २०२५ मध्ये २४ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. जगात कपड्यांची मागणी वाढेल मात्र त्याचा जास्तीत जास्त वाटा पॉलिस्टर काबीज करेल, असा अंदाज आहे.
आता पॉलिस्टरच्या कपड्यांचे बाजारात काय स्थान आहे ते पाहू. पॉलिस्टरच्या कपड्यांना अलीकडच्या काळात पसंती वाढली आहे. त्यामुळे सहाजिकच पॉलिस्टरला मागणीही वाढली. जगात २०१५ पर्यंत ४४६ लाख टन पॉलिस्टर कापडाची निर्मिती झाली होती. त्यानंतर या कापडाची मागणी आणि उत्पादनही वाढत राहिले. २०२१ मध्ये पॉलिस्टर कापडाचे उत्पादन ५५७ लाख टनांवर पोहोचले. तर २०२५ पर्यंत पॉलिस्टर कापडाचे उत्पादन ५६३ लाख टनांपर्यंत स्थिरावेल, असा अंदाजही एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
या काळात पॉलिस्टर कापडाचे एकूण कापड उत्पादनातील प्रमाण ५२ टक्क्यांवरून ५७ टक्क्यांपर्यंत पोहोचले; मात्र २०२५ पर्यंत हे प्रमाण ५६ टक्क्यांपर्यंत घसरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Production of polyester fabrics instead of cotton is on the rise
Cotton Boll Worm : कापूस पट्ट्यात पुन्हा बोंडअळीचा प्रादुर्भाव

पॉलिस्टरचे प्रमाण ठरतेय कापसासाठी मारक
जगात २०१५ ते २०२१ या काळात पॉलिस्टरच्या उत्पादनात मोठी वाढ झाली. तर दुसरीकडे कापूस कापडाचे उत्पादन मात्र वाढले. तर एकूण कापड उत्पादनातील प्रमाणही पॉलिस्टरचेच वाढले. पॉलिस्टरचे वाढते प्रमाण कापसासाठी मारक ठरतेय. अतिपाऊस, दुष्काळ, उष्णता, कीड-रोग यामुळे कापूस उत्पादनावर अनेक देशांमध्ये परिणाम होतोय. कापूस कमी पडल्यास काही प्रमाणात का होईना कापड उद्योग पॉलिस्टरला पसंती देतो. परिणामी कापूस कापडाची मागणी कमी होऊन उत्पादनही कमी होते. याचा थेट परिणाम कापूस उत्पादकांना मिळणाऱ्या दरावरही होत असतो, असे जाणकारांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com