Raisin Production : निर्यातक्षम द्राक्षमालाचे मनुके करण्याची वेळ

गेल्या पंधरवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे निर्यातक्षम द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले. कृषी विभागाने पंचनामे केल्यानुसार ७ ते १६ एप्रिलदरम्यान ३ हजार ४१० हेक्टर क्षेत्रावर बागांची धूळधाण झाली आहे.
Raisin Production
Raisin ProductionAgrowon

Nashik News गेल्या पंधरवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे (Hailstorm) निर्यातक्षम द्राक्ष (Exportable Grape) बागांचे अतोनात नुकसान झाले. कृषी विभागाने (Agriculture Department) पंचनामे केल्यानुसार ७ ते १६ एप्रिलदरम्यान ३ हजार ४१० हेक्टर क्षेत्रावर बागांची धूळधाण झाली आहे.

शेतकऱ्यांनी एकरी २.५० लाख रुपये खर्च व घेतलेली मेहनत पाण्यात गेली आहे. त्यामुळे व्यापारी चांगला माल पडत्या भावात मागत आहेत. प्रतिकिलोला २५ रुपये खर्च असताना त्यास १० ते १२ तर बेदाण्याला २ ते ५ रूपये भाव मिळत आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षाचे मनुके करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Raisin Production
Grape Harvesting Management : द्राक्ष काढणीनंतर विश्रांतीच्या काळात बागेकडे दुर्लक्ष नको

गेल्या काही वर्षानंतर पुन्हा एकदा हंगामाच्या अंतिम टप्प्यात वादळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचा पिच्छा पुरविला आहे. अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने व वादळी वाऱ्याने बागा जमीनदोस्त झाल्याने शेतकरी पूर्ण अडचणीत सापडला आहे. द्राक्ष मालाचे मोठे नुकसानही आहे.

काही ठिकाणी थोडेफार नुकसान असताना देखील व्यापाऱ्यांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्चही वसूल करणे मुश्कील झाले आहे. व्यापारी खरेदी करण्यासाठी ना उत्तर देत आहेत, ना प्रतिसाद अशी वाईट परिस्थिती आहे.

Raisin Production
Grape Export : सांगलीतून परदेशातील द्राक्ष निर्यातीत १४७६ टनांनी वाढ

वायनरी उद्योगाने आपापल्या क्षमतेनुसार द्राक्षमालाची खरेदी केली; मात्र ती निम्म्याच्या खाली असल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोंडीत आहे. तर बेदाणा व्यापारी अशा परिस्थितीत मातीमोल दराने मागणी करत आहेत.

२०० कोटींचे भांडवल गेल्या पंधरवड्यात मातीमोल झाले. शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून गेला आहे. अशा परिस्थितीत बँका त्यांच्याकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावत आहेत. त्यामुळे सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...

- नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी मार्केट पाडले

- पावसाचे कारण पुढे करून व्यापाऱ्यांची खरेदीस टाळाटाळ

- मनुके तयार करण्यासाठी शेतकऱ्यांकडे जागा, सुविधेची अडचण

जिल्ह्यात द्राक्षबागांचे नुकसान असे : (७ ते १६ एप्रिल दरम्यान)

तालुका...नुकसान (हेक्टर)

सटाणा...५१.८०

नांदगाव...०.९०

कळवण...४

दिंडोरी...२०४५.५८

नाशिक...२०४.२९

त्र्यंबकेश्र्वर...३.१०

निफाड...१००१.४९

सिन्नर...१३.२४

चांदवड...७९.५२

येवला...६.३०

एकूण...३४१०.२२

गारपीट झालेल्या भागात वायनरी उद्योगाने ३ ते ५ रुपयांनी खरेदी केली. बेदाणा व्यापारी माल घ्यायला तयार नाही. इतर चांगला माल ३ रुपये किलोने व्यापारी मागत होते. त्यामुळे द्राक्ष घड वाळत घालण्याची वेळ अनेकांवर आली आहे. जागेअभावी अनेकांनी मातीमोल भावात माल विकला. विक्री परवडत नसल्याने आम्ही मनुके बनवत आहोत.
- संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
पावसामुळे द्राक्षे खराब झाली. व्यापारी खरेदीस येत नव्हते. तर बेदाणा उत्पादन लूट भावाने मागत होते. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही. कष्ट करून पदरी काहीच नसल्याने बाग तोडण्याची वेळ आली आहे. त्यात बँक तगादा लावत आहे.
- भारत तिडके, द्राक्ष उत्पादक, जिव्हाळे, ता. निफाड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com