Prof. Bapu Adkine : प्रा. बापू अडकिणे यांचे निधन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तसेच कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. बापू अडकिणे (वय ७८) यांचे बुधवारी (ता. १६) सकाळी दीर्घ आजाराने परभणी येथे निधन झाले.
Prof. Bapu Adkine
Prof. Bapu AdkineAgrowon

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तसेच कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. बापू अडकिणे (वय ७८) (Prof. Bapu Adkine) यांचे बुधवारी (ता. १६) सकाळी दीर्घ आजाराने परभणी येथे निधन झाले. प्रा. अडकिणे यांनी त्यांच्या विद्यापीठातील सेवेच्या काळात सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख, मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख, विद्यापीठ अभियंता या पदांचा पदभार सांभाळला.

Prof. Bapu Adkine
Color Cotton Verity : नैसर्गिक रंगीत कापसाचे तीन वाण विकसित

ते एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून सर्वत्र परिचित होते. सुरुवातीपासूनच विद्यार्थी निर्मिती चळवळीत ते सहभागी होते. महाराष्ट्र सिंचन सहयोग या संस्थेच्या निर्मितीत त्यांचे खूप मोठे योगदान आहे. सध्या ते महाराष्ट्र सिंचन सहयोग या संस्थेचे उपाध्यक्ष होते. तसेच परभणी सिंचन सहयोगचे सल्लागार म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली राज्यातील पहिली सिंचन परिषद १९९९ साली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे पार पडली. तसेच २०१७ साली १८ वी सिंचन परिषद त्यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली. सिंचनाविषयी त्यांनी विपुल लेखन केले आहे.

Prof. Bapu Adkine
Soybean Rate : सोयाबीनचे दर स्थिर

दैनिक ‘ॲग्रोवन’मध्ये त्यांचे लेख प्रकाशित झाले. विस्तार कार्यामध्ये ते खूप आघाडीवर होते. नेहमी त्यांच्यासोबत शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांचा राबता असायचा. त्यांच्या पश्चात त्यांच्या पाठीमागे दोन मुले, दोन सुना, चार नातवंडे आणि त्यांच्या पत्नी असा परिवार आहे. प्रा. अडकिणे यांचे मूळ गाव इंजनगाव (ता. वसमत) आहे. एक शिस्तप्रिय प्राध्यापक, कठोर शिस्तीचे प्रशासक आणि मनमिळावू शिक्षक अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांच्या जाण्याने कृषी अभियांत्रिकी विद्या शाखेचे खूप मोठे नुकसान झाले आहे. परभणी येथील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या जडणघडणीत त्यांचा खूप मोठे योगदान आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com