FPO Project : तेरा एफपीओंच्या प्रकल्पांना ‘स्मार्ट’अंतर्गत मान्यता

४० कंपन्यांकडून प्राथमिक मान्यतेसाठी डीपीआर सादर
FPO
FPOAgrowon

नांदेड : स्मार्ट प्रकल्पातर्ंगत जिल्ह्यातील ४० शेतकरी उत्पादक कंपन्यांनी प्राथमिक मान्यतेसाठी डीपीआर (DPR) सादर केले होते. यातील १३ कंपन्यांच्या प्रकल्पांना राज्यस्तरावरून अंतिम मान्यता देण्यात आली आहे. यातील १३ कंपन्यांचे प्रस्ताव कर्ज मान्यतेच्या स्तरावर आहेत. तर एका कंपनीला निधी वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्राने दिली.

FPO
‘स्मार्ट’मधील २३१ प्रकल्पांना मान्यता

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतीउत्पादन आधारित प्रकल्प स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, आत्माच्या प्रकल्प उपसंचालक माधुरी सोनवणे यांनी प्रकल्प आराखडे कसे तयार करायचे याविषयी वेळोवेळी माहिती दिली.

यानुसार जिल्ह्यातील ४० शेतकरी उत्पादक कंपन्यानी प्रकल्पाच्या प्राथमिक मान्यतेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर केला होता. यातील १३ कंपन्यांच्या प्रकल्पांना अंतिम मंजुरी मिळाली आहे. यातील १३ कंपन्यांचे प्रस्ताव कर्ज मान्यतेच्या स्तरावर आहेत. तर एका कंपनीला निधी वितरित करण्यात आले आहे. इतर कंपन्यांनी वेळेवर प्रकल्प अहवाल सादर करावा, अन्यथा त्यांची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा प्रकल्प अहवाल सादर करावा लागेल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रानी दिली. प्रकल्पांमध्ये सर्वाधिक कंपन्यांनी स्वच्छता व प्रतवारी युनिट प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे. काही कंपन्यांनी हळद प्रक्रिया युनिट, दालमील, गोदाम आदी बाबी प्रस्तावित केल्या आहेत.

 

FPO
महाराष्ट्रासह तीन राज्यात ४० बांबू FPO ला केंद्राची मान्यता

राज्यस्तरावरून अंतिम मान्यता मिळालेल्या कंपन्या
साई शिवेंद्र एफपीओ, लोहा, शेतकरी मित्र एफपीओ, अर्धापूर, शिवखंडी एफपीओ, कंधार, गोविंद प्रभू एफपीओ, लोहा, आसावरी एफपीओ, लोहा, रूपालीशिव एफपीओ, बिलोली, किनवट परिसर एफपीओ, किनवट, देशमुख एफपीओ, नांदेड, के. संभाजी पवार एफपीओ, नायगाव, गोदामाई रुरल एफपीओ, धर्माबाद, ग्रीन ओझोन एफपीओ, मुखेड, शितलादेवी एफपीओ, मुदखेड आणि श्रावणी श्रेयशी एफपीओ बिलोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com