हरियानामध्ये बाजरीऐवजी डाळी, तेलबियांना प्रोत्साहन

‘पीक विविधीकरण योजने’अंतर्गत हरियाना सरकारने दक्षिण हरियानातील सात जिल्ह्यांमध्ये बाजरीच्या जागी कडधान्य आणि तेलबिया पिकांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.
Oilseed
OilseedAgrowon

चंडीगड (पीटीआय) ः ‘पीक विविधीकरण योजने’अंतर्गत (Crop Diversification Scheme) हरियाना सरकारने दक्षिण हरियानातील सात जिल्ह्यांमध्ये बाजरीच्या (Millet) जागी कडधान्य (Pulses) आणि तेलबिया पिकांना (Oil Seed Crop) प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.

भिवानी, चरखी दादरी, महेंद्रगड, रेवाडी, झज्जर, हिस्सार आणि नूह या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. या योजनेतून राज्यभरात किमान १ लाख एकर जमिनीवर डाळी आणि तेलबिया पिके घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे राज्य सरकारच्या निवेदनात नमूद केले आहे.

केंद्र सरकारने डाळी आणि तेलबियांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे, असेही कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुमिता मिश्रा यांनी निवेदनात नमूद केले आहे.

मिश्रा म्हणाल्या, ‘‘या योजनेअंतर्गत कडधान्यांमध्ये मूग, अरहर आणि उडदाचा समावेश आहे. तसेच एरंड, भुईमूग आणि तीळ यांसह तेलबिया पिकांची लागवड करता येते. या योजनेअंतर्गत प्रतिएकर ४ हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्‍यांना प्रथम ‘मेरी फसल मेरा ब्योरा’ या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल आणि पडताळणीनंतर रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.’’ ‘‘पिकांच्या नवीन वाणांची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. कडधान्ये पिकविल्याने जमिनींचे आरोग्य सुधारून सुपीकता वाढेल,’’ असेही त्या म्हणाल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com