Agriculture Department : कृषी खात्यातील ९२ अधिकाऱ्यांना पदोन्नती

Agriculture Department Update : कृषी खात्यातील ९२ तंत्र अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचे आदेश कृषी मंत्रालयाचे अवर सचिव अ. नि. साखरकर यांनी जारी केले आहेत.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Pune News : कृषी खात्यातील ९२ तंत्र अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचे आदेश कृषी मंत्रालयाचे अवर सचिव अ. नि. साखरकर यांनी जारी केले आहेत. राज्यभरात विविध ठिकाणी रिक्त असलेल्या कृषी उपसंचालक व उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या जागा या पदोन्नत्यांमुळे भरल्या जात आहेत.

उच्च न्यायालयात २०१५ मध्ये दाखल झालेल्या एका याचिकेवर राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात रिक्त असलेल्या पदांवर ज्येष्ठतेनुसार या पदोन्नत्या दिल्या जात आहेत, असे अवर सचिवांनी नमुद केले आहे.

या पदोन्नत्या तात्पुरत्या असल्यामुळे सेवाज्येष्ठतेचा हक्क सांगता येणार नाही. तसेच तात्पुरती पदोन्नती नाकारली गेल्यास २०२२-२३ च्या निवडसूचीतून या अधिकाऱ्यांची नावे काढली जातील व ती २०२५-२६ मधील यादीत टाकली जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Agriculture Department
Agriculture Department : कृषिसेवकांची मानधनवाढ अंतिम निर्णयाअभावी रखडली

कृषी आयुक्तांनी तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, असे सांगत शासनाने पदोन्नतीसाठी पाठवलेल्या अधिकाऱ्यांची नावे व कंसात नियुक्तीचे नवे ठिकाण असे ः अंकुश बरडे (प्रमुख, संनियंत्रण व मूल्यमापन कक्ष, कृषी आयुक्तालय), रामदास बुचडे (उपसंचालक, मृद्‌ सर्वेक्षण व मृद्‌ चाचणी, कृषी आयुक्तालय), राजाराम खरात (प्रकल्प उपसंचालक, आत्मा, सांगली), बाळासाहेब लांडगे (उपविभागीय कृषी अधिकारी, पंढरपूर), राजकुमार रणवीर (उपविभागीय कृषी अधिकारी, किनवट), रविकांत घोडीचोर (उपसंचालक, आदर्श गाव, कृषी आयुक्तालय),

दिलीप जाधव (उपविभागीय कृषी अधिकारी, लातूर), पोपट पाटील (उपविभागीय कृषी अधिकारी, सावंतवाडी), किशोर पात्रिकर (उपविभागीय कृषी अधिकारी, साकोली), शिवाजी भांडवलकर (उपविभागीय कृषी अधिकारी, रायगड), चंद्रकांत ठाकरे (उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, चंद्रपूर), नितीन फुलसुंदर (उपविभागीय कृषी अधिकारी, खोपोली), जानबा झगडे (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग), सुनील सोनकुसरे (जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी, अकोला), चेतन ठाकरे (उपविभागीय कृषी अधिकारी, नंदुरबार),

तुळशीराम चौधरी (उपविभागीय कृषी अधिकारी, काटोल), शंकर काळे (बीज परीक्षण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर), सुधीर नाईनवाड (उपविभागीय कृषी अधिकारी, कल्याण), अशोक डमाळे (उपविभागीय कृषी अधिकारी, कळवण), अरुणा लांडे (उपसंचालक,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग), शुभांगी टोपरे (प्रकल्प उपसंचालक, आत्मा, पालघर), बाळासाहेब नितनवरे (समन्वयक अधिकारी, उपसंचालक, कृषी व्यवसाय, स्मार्ट, बीड), प्रकाश पाटील (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर), पंकज चेडे (उपविभागीय कृषी अधिकारी, अमरावती), महेश परांजपे (उपविभागीय कृषी अधिकारी, वडसा), विजय शिराळ (विभागीय बीज

प्रमाणीकरण अधिकारी, अकोला), नामदेव परीट (प्रकल्प उपसंचालक, आत्मा, सिंधुदुर्ग), रवींद्र वाघ (उपविभागीय कृषी अधिकारी, अचलपूर), विवेक गायकवाड (विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी, जालना), सुभाष आघाव (उपविभागीय कृषी अधिकारी, सिल्लोड), संजय पिंगट (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर),

सतीश शिरसाट (उपविभागीय कृषी अधिकारी, राजगुरुनगर), भालचंद्र वाघ (उपविभागीय कृषी अधिकारी, हिंगोली), कुडल हसरमणी (बीज परीक्षण अधिकारी, अकोला), महादेव आसलकर (उपविभागीय कृषी अधिकारी, धाराशिव),

मंजूषा राऊत (उपसंचालक, वसंतराव नाईक कृषी व्यवसाय प्रशिक्षण संस्था, नागपूर), पल्लवी तलमले (उपसंचालक, आत्मा, नागपूर), अर्चना राऊत (समन्वयक अधिकारी, उपसंचालक, कृषी व्यवसाय, स्मार्ट, गडचिरोली), प्रीती बावणे (उपसंचालक, आत्मा, अमरावती), चंद्रशेखर पाटील (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा), गणपती पाटील (उपविभागीय कृषी अधिकारी, मिरज),

परमेश्‍वर वाघमोडे (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर), रवींद्र हरणे (उपविभागीय कृषी अधिकारी, परभणी), वीरेंद्र रजपूत (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर), बापू गावित (उपविभागीय कृषी अधिकारी, धुळे), वसंत चौधरी (उपसंचालक, आत्मा, अहमदनगर), राजेंद्र काळे (उपविभागीय कृषी अधिकारी, उदगीर),

विलास गायकवाड (उपविभागीय कृषी अधिकारी, संगमनेर), गिरीश कुलकर्णी (उपविभागीय कृषी अधिकारी, राजुरा), विनायक देशमुख (उपविभागीय कृषी अधिकारी, गडहिंग्लज), पोपट नवले (उपविभागीय कृषी अधिकारी, अहमदनगर), अशोक आढाव (उपविभागीय कृषी अधिकारी, वैजापूर),

गोकुळ अहिरे (उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव), महेश वैद्य (उपविभागीय कृषी अधिकारी, पांढरकवडा), रामेश्‍वर रोडगे (उपविभागीय कृषी अधिकारी, हिंगणघाट), बाळासाहेब व्यवहारे (उपविभागीय कृषी अधिकारी, खामगाव), कैलास धुमाळ (उपविभागीय कृषी अधिकारी, फलटण), राम फडतरे (उपसंचालक, फलोत्पादन क्रमांक चार, कृषी आयुक्तालय), जाकिर अहमद (विभागीय सांख्यिक, छत्रपती संभाजीनगर),

Agriculture Department
Agriculture Department : कृषी विभागाची भरारी पथके सज्ज

संजय विश्‍वासराव (उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, पुणे), दशरथ घोलप (उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, ठाणे), चंद्रकांत पाटील (उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जळगाव), शिलानाथ पवार (उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, धुळे), श्रीधर काळे (उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कोल्हापूर),

विजय भोसले (उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, सातारा), सुरेश कोन्नाके (उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, गोंदिया), महेश क्षीरसागर (उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, लातूर), श्याम जोशी (उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, भंडारा), हरिराम नागरगोजे (उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, नांदेड),

कांतिलाल पवार (उपसंचालक, आयुक्त कक्ष, पुणे), विश्‍वनाथ दारकुंडे (उपसंचालक, सांख्यिकी १, पुणे), दिलीप ढेबरे (उपसंचालक, मनुष्यबळ विकास कक्ष, पुणे), अशोक पवार (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे), हनुमंत शिंदे (उपसंचालक, प्रशिक्षण, कृषी आयुक्तालय, पुणे), यशवंत केंजळे (उपसंचालक, संगणक प्रकल्प, पुणे), प्रमोद सावंत (जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी, चिखली), शरद सोनावणे (उपसंचालक, प्रयोगशाळा, पुणे), पांडुरंग साळवे (प्रकल्प उपसंचालक, आत्मा, जळगाव), नामदेव गायकवाड (प्रकल्प उपसंचालक, आत्मा, सोलापूर),

रमेश देशमुख (प्रकल्प उपसंचालक, आत्मा, वर्धा), अनिल कुलकर्णी (प्रकल्प उपसंचालक, आत्मा, छत्रपती संभाजीनगर), संदीप मेढे (विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी, नागपूर), शरद शिनगारे (समन्वयक अधिकारी, उपसंचालक, स्मार्ट, परभणी), शंकर माळी (विभागीय सांख्यिक, कोल्हापूर),

जितेंद्र शहा (समन्वयक अधिकारी, उपसंचालक, स्मार्ट, नाशिक), हनुमंतराय मेडिदार (समन्वयक अधिकारी, उपसंचालक, स्मार्ट, सांगली), गुलाब भदाणे (समन्वयक अधिकारी, उपसंचालक, स्मार्ट, वर्धा), श्रीकांत देशपांडे (समन्वयक अधिकारी, उपसंचालक, स्मार्ट, जालना)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com