‘एक दिवस बळीराजासाठी’मुळे कृषिक्षेत्राला चालना

शेतकऱ्यांचा कृषी विभागाशी संपर्क वाढला, तर शासनाच्या विकासात्मक योजना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचायला वेळ लागणार नाही.
Agriculture
Agriculture Agrowon

कोवाड (जि. कोल्हापूर) ः शेतकऱ्यांचा कृषी विभागाशी संपर्क (Connectivity With Agriculture Department) वाढला, तर शासनाच्या विकासात्मक योजना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचायला वेळ लागणार नाही. त्यासाठी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा शासनाचा नवा उपक्रम कृषीक्षेत्राला चालना देणारा ठरेल. त्यासाठी शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील (Vikas Patil) यांनी केले.

Agriculture
मेळघाटातून रुजणार ‘माझा एक दिवस बळीराजासाठी’ अभियान

मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथे कृषी विभागामार्फत आयोजित ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मांडेदुर्ग व सुंडी येथील शेतकऱ्यांची भेट घेतली. शिवमुद्रा शेतकरी गट व सुंडी येथील शिवसंग्राम अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कोल्हापूरचे विभागीय नोडल अधिकारी स्मार्टचे उमेश पाटील उपस्थित होते.

तालुका कृषी अधिकारी यशोदीप पोळ यांनी चंदगड तालुक्यातील विविध पिकांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्यांचा आढावा घेतला. विकास पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना‘ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या शासनाच्या उपक्रमाची माहिती दिली. १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम राबवला जाणार असल्याने तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी महिन्यातून एक दिवस या उपक्रमांतर्गत गावांना भेटी देणार आहेत. शेतकऱ्यांना आपल्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडून सोडवणूक करून घेता येणार आहे. नवीन योजनांची व तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

शेतकऱ्यांनी भात, ऊस, नाचणी, सोयाबीन व काजू या पिकांबाबत येणाऱ्या समस्या विचारल्या. उपविभागीय कृषी अधिकारी सतीश रोकडे, सुंडीचे सरपंच मनोज कांबळे, मंडल कृषी अधिकारी विजय गंबरे, सतीश कुंभार, अभिजित देवणे, सुधाकर मुळे, अतुल मुळे, शिवमुद्रा शेतकरी गटाचे अध्यक्ष गणपती पवार आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com