Silk Farming : नांदेडमध्ये रेशीम रथाद्वारे प्रचार मोहीम

रेशीम लागवडीतून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा मार्ग मिळावा यासाठी जिल्हा रेशीम विकास कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या महारेशीम अभियान २०२३ अंतर्गत रेशीम प्रचार रथाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवारी (ता. २५) हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
Silk Farming
Silk FarmingAgrowon

नांदेड : रेशीम लागवडीतून (Silk Farming) शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा मार्ग मिळावा यासाठी जिल्हा रेशीम विकास कार्यालयामार्फत (Silk Development Board) राबविण्यात येणाऱ्या महारेशीम अभियान (Mahareshim Abhiyan) २०२३ अंतर्गत रेशीम प्रचार रथाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवारी (ता. २५) हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, कृषी विकास अधिकारी डॉ. तानाजी चिमण शेटे, रेशीम विकास अधिकारी नृसिंह बावगे, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक वी. यु. भंडारे आदी उपस्थित होते. जिल्हा रेशीम विकास कार्यालयामार्फत तुती लागवडीसाठी लाभार्थी निवडण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Silk Farming
Silk Farming : तुती रेशीम बीज दरात सुधारणा करण्याचा निर्णय

यात लाभार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, दारिद्र्य रेषेखालील, महिला प्रधान कुटुंब, शारीरिक दिव्यांग प्रधान कुटुंब, भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन्य निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम २००६ नुसार पात्र व्यक्ती, कृषी माफी योजना २००८ नुसार अल्पभूधारक, एक हेक्टरपेक्षा जास्त व दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले सीमांवर शेतकऱ्यांना रेशीम शेती तसेच तुती लागवड जोपासण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून अनुदान दिले जाते.

Silk Farming
Silk Farming : महारेशीम अभियानाला सुरुवात

यात तुती लागवडीपासून रेशीमकोष उत्पादकापर्यंत अनुदान आहे. हे अनुदान प्रती एकर ३ वर्षाच्या कालावधित ३ लाख ४२ हजार रुपयापर्यंत दिले जाते. अधिक माहितीसाठी व योजनेच्या लाभासाठी जिल्हा रेशीम विकास अधिकारी येथे संपर्क साधावा, असे आवाहन एन. बी. बावगे यांनी केले आहे.

...असे दिले जाते अनुदान

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) अंतर्गत तुती लागवडीसाठी अल्पभूधारकाला ३७ हजार ५००, बहुभूधारकाला ३२ हजार ५००, किटक संगोपन साहित्यासाठी अल्पभूधारकाला ५६ हजार २५० रुपये तर बहुभूधारकाला ४८ हजार ७५० रुपये, किटक संगोपन गृहासाठी अल्पभूधारकाला १ लाख २६ हजार ४०० रुपये तर बहुभूधारकाला १ लाख ९ हजार ६१५ रुपये एवढे अनुदान दिले जाते.

अभियान काळात शेतकऱ्यांनी, इच्छुक बेरोजगार तरुणांनी रेशीम शेती योजनेसाठी पाचशे रुपये प्रती एकर असे शुल्क जमा करून नाव नोंदणी करावी.
नृसिंह बावगे, रेशीम विकास अधिकारी, नांदेड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com