बियाण्यांच्या ३७ वाणांचे प्रस्ताव नामंजूर

राज्यातील किंवा परराज्यांतील कोणत्याही बियाणे उत्पादक कंपनीने सुधारित किंवा संकरित गटात नवे वाण तयार केल्यानंतर कृषी विभागाची मान्यता घ्यावी लागते.
Seed
SeedAgrowon

पुणे ः बियाणे उद्योगातील (Seed Industry) विविध कंपन्यांनी तयार केलेल्या ३७ नव्या वाणांना (Seed Verity) तांत्रिक व शास्त्रीय उणिवा आढळल्यामुळे बाजारपेठेत विक्रीसाठी मान्यता नाकारण्यात आलेली आहे. (Seed Verity Rejected)

राज्यातील किंवा परराज्यांतील कोणत्याही बियाणे उत्पादक (Seed Producer) कंपनीने सुधारित किंवा संकरित गटात नवे वाण तयार केल्यानंतर कृषी विभागाची मान्यता घ्यावी लागते. कंपन्यांकडून आधी स्वतःच्या प्रक्षेत्रावर, त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतात चाचण्या घेतल्या जातात. त्याचे निष्कर्ष समाधानकारक आल्यानंतर नवे वाण कृषी विद्यापीठांकडे चाचण्यांसाठी दिले जाते. विद्यापीठांचे निष्कर्ष चांगले आल्यानंतर शेवटची मंजुरी कृषी विभागाकडून घ्यावी लागते. सरकारी मान्यतेशिवाय बियाणे कंपनीला नवे वाण थेट बाजारात विक्रीसाठी आणता येत नाही.

Seed
Oil Seed Meal : तेलबियापेंड निर्यात ३९ टक्क्यांनी वाढली

‘‘नवे वाण नामांकित कंपनीचे असले किंवा कृषी विद्यापीठाच्या चाचणीत उत्तीर्ण झाले तरी विक्रीसाठी कृषी विभागाकडून तत्काळ मान्यता दिली जात नाही. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून नव्या वाणाच्या तांत्रिक माहितीचा अभ्यास केला जातो. कृषी विभागातील अधिकारी व कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ समितीसमोर या वाणाची माहिती कंपनीला द्यावी लागते. चालू वर्षात १०९ कंपन्यांनी नव्या वाणाला मान्यता देण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. परंतु उणिवा आढळल्यामुळे ३७ वाणांचे प्रस्ताव नामंजूर केले गेले आहेत. मात्र शास्त्रीय माहिती समाधानकारक असलेल्या उर्वरित २६३ प्रस्तावांमधील नव्या वाणांना मंजुरी देण्यात आली आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

Seed
Seed : घरचे बियाणे वापरल्याने वाशीम जिल्ह्यात वाचले ४० ते ४२ कोटी

बियाणे कंपन्यांनी कृषी विभागाकडे मे २०२२ पर्यंत नव्या वाणांचे एकूण ३२१ प्रस्ताव सादर केले होते. प्रस्तावांची छाननी करणाऱ्या तज्ज्ञ समितीसमोर कंपनीच्या शास्त्रज्ञ किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याला तांत्रिक माहितीचे सादरीकरण करावे लागते. प्रस्ताव सादर केल्यानंतर काही कंपन्यांनी सादरीकरणच केले नाही. त्यामुळे अशा २१ वाणांच्या मान्यतेची प्रक्रियादेखील स्थगित करण्यात आली आहे.

‘‘शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात सातत्याने वाढ होण्यामागे बाजारपेठेत येणाऱ्या नवनवीन बियाण्यांचा मोठा वाटा आहे. प्रयोगशील शेतकरीही सतत नव्या बियाण्यांच्या शोधात असतात. मका तसेच भाजीपाला बियाण्यांमध्ये नव्या जाती आणण्याकडे बियाणे कंपन्यांचा प्रयत्न जास्त असतो. त्यातून कंपन्यांना चांगला नफा मिळतो. अर्थात, बाजारातील सध्याच्या उपलब्ध बियाण्यांच्या तुलनेत नव्या वाणात काही वेगळी वैशिष्ट्ये असली तरच कृषी विभागाकडून मान्यता दिली जाते. जुन्या वाणापेक्षा कमी उत्पादकता तसेच कीड-रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता कमी असल्याचे जाणवल्यास नामांकित कंपनीचा प्रस्तावदेखील नाकारला जातो,’’ असे कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com