नवीन पंधरा वाणांच्या प्रस्तावांची केंद्राकडे शिफारस

केंद्र शासनाच्या बियाणे समितीमार्फत पिकांचे नवीन वाण अधिसूचित करण्यासाठी राज्य बियाणे उपसमितीची केंद्र शासनास शिफारशींची आवश्यकता असते. त्यानुसार राज्यातील ४ कृषी विद्यापीठे व एका कृषी संशोधन संस्थेकडून समितीकडे पिकांच्या एकूण १५ वाणांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते.
Agriculture
Agriculture Agrowon

नाशिक : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (Dr. Panjabrao agriculture University) (अकोला), महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV) (राहुरी), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) व राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र (सोलापूर) यांच्या अन्नधान्य व फळपिकांच्या नवीन १५ वाणांच्या (New Crop Verity) प्रस्तावांना राज्य बियाणे उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यांनतर या प्रस्तावांची केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडे शिफारस करण्यात आली, अशी माहिती राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी दिली.

Agriculture
Soybean : एकूण पेरणीच्या निम्मे क्षेत्र सोयाबीन

राज्य शासनाच्या राज्य बियाणे उपसमितीची ५२ वी विशेष बैठक गुरुवारी (ता.१८) मुंबई येथे मंत्रालयात कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी कृषी आयुक्तालयाचे गुणवत्ता व नियंत्रण संचालक दिलीप झेंडे, चारही कृषी कृषी विद्यापीठांचे कृषी संशोधन संचालक, शेतकरी प्रतिनिधी खंडू बोडके पाटील, चंद्रकांत शेवाळे यांच्यासह सर्व विद्यापीठांचे कुलगुरू व प्रतिनिधी उपस्थित होते.

Agriculture
Cotton : साठ गावांत ‘एक गाव एक वाण’

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सर्वाधिक प्रस्ताव

केंद्र शासनाच्या बियाणे समितीमार्फत पिकांचे नवीन वाण अधिसूचित करण्यासाठी राज्य बियाणे उपसमितीची केंद्र शासनास शिफारशींची आवश्यकता असते. त्यानुसार राज्यातील ४ कृषी विद्यापीठे व एका कृषी संशोधन संस्थेकडून समितीकडे पिकांच्या एकूण १५ वाणांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यामध्ये अन्नधान्य पिकांचे १०, तर फळ पिकांच्या ५ प्रस्तावांचा समावेश होता. यापैकी सर्वाधिक प्रस्ताव हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आहेत.

बैठकीत या नवीन वाणांबाबत सविस्तर चर्चा करून त्याबाबत केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाणांचे गुणधर्म, एकरी उत्पादकता, लागवड पद्धतींच्या संक्षिप्त माहितीचे सादरीकरण संबोधित विद्यापीठाच्या कृषी संशोधन संचालकांनी केले. त्यानंतर या १५ वाणांच्या शिफारशीला मान्यता देण्यात आली.

कृषी संशोधन संस्थानिहाय वाण

...पीक...वाण

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

रब्बी ज्वारी...ट्रॉम्बे अकोला सुरूची

भात...पीडीकेव्ही साधना

महात्मा फुले कृषी विद्यापीठ

गहू...फुले अनुपम (NIAW-३६२४)

ज्वारी...फुले यशोमती (RSV१९१०/spv-२६५३)

ऊस...फुले COM ११०८२)

उडीद...फुले वसू पियू-०६०९-४३

तीळ...फुले पूर्णा

पेरू...फुले अमृत

चिंच...फुले श्रावणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ

ज्वारी...परभणी वसंत (PVRSG-१०१)

सोयाबीन...एमएयूएस-७२५

करडई...परभणी सुवर्णा (PBNS-१५४)

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ

नारळ...कोकोनट हायब्रीड GBCD X ECT

तेलताड...NRCOP-02 (90 DX 577 P)

राष्ट्रीय डाळिंब कृषी संशोधन केंद्र

डाळिंब...सोलापूर लाल

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com