कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करावेत

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती व पूरक क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना, संस्थांना पुरस्कार देण्यात येतात.
Department Of Agriculture
Department Of AgricultureAgrowon

पुणे : ‘‘महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत (Agriculture Department) शेती व पूरक क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना, संस्थांना पुरस्कार (Agriculture Award) देण्यात येतात. यंदाच्या शेती क्षेत्राशी संबंधित विविध पुरस्कारांसाठी कृषी विभागातर्फे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करावेत,’’ असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर (Subhash Katkar) यांनी केले.

Department Of Agriculture
Agriculture Advisory : कृषी सल्ला (कोकण विभाग)

कृषी विभागातर्फे डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार (७५ हजार रुपये), वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी ५० हजार रुपये), जिजामाता कृषिभूषण पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, ५० हजार रुपये), कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी ५० हजार रुपये), युवा शेतकरी पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी ३० हजार रुपये), वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी ३० हजार रुपये), उद्यान पंडित पुरस्कार (आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक, प्रत्येकी २५ हजार रुपये), सर्वसाधारण गटासाठी प्रतिजिल्हा या प्रमाणे ३४ आणि आदिवासी गटासाठी प्रतिविभाग १ या प्रमाणे ६ असे एकूण ४० वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (प्रत्येकी ११ हजार रुपये) आणि आठ कृषी विभागातून प्रत्येकी १ अधिकारी, कर्मचारी या प्रमाणे ८ तसेच कृषी आयुक्तालय स्तरावरून एक असे एकूण ९ पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार या नऊ पुरस्कारांसाठी २० ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावयाचे आहेत.

Department Of Agriculture
Agriculture Implements : दुचाकीचलित शेती अवजारे

कृषी पुरस्कारांच्या संख्येमध्ये १५ फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयानुसार वाढ करण्यात आली आहे. काही अंशी निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व नावीन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या युवा शेतकऱ्यांसाठी पुणे विभागातून युवा शेतकरी पुरस्कार या वर्षांपासून नव्याने देण्यात येणार आहे.

सर्व शेतकरी, शेतकरी गट, संस्थांनी मार्गदर्शक सूचनेनुसार, कृषी पुरस्कारासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात २० ऑगस्ट पर्यंत सादर करावा. विविध कृषी पुरस्कारांच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे काटकर यांनी कळविले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com