Electricity Rate : वीज दरवाढीच्या प्रस्तावाची करणार होळी

महावितरणने पुढील दोन वर्षांसाठी वीज दरवाढीचा प्रस्‍ताव ठेवला असून, ही दरवाढ सरासरी २.५५ रुपये प्रतियुनिट म्‍हणजे सरासरी ३७ टक्‍के एवढी आहे.
Electricity
ElectricityAgrowon

Electricity Bill खामगाव, जि. बुलडाणा ः महावितरणने (Mahavitaran) पुढील दोन वर्षांसाठी वीज दरवाढीचा (Electricity Rate) प्रस्‍ताव ठेवला असून, ही दरवाढ सरासरी २.५५ रुपये प्रतियुनिट म्‍हणजे सरासरी ३७ टक्‍के एवढी आहे. दरवाढीच्‍या प्रमाणात इलेक्‍ट्रिसिटी ड्यूटी रकमेचा अतिरिक्‍त बोजा पडणार असल्‍याने वीज ग्राहकांना शॉक बसणार आहे.

ही दरवाढ पूर्णपणे रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्‍ह्यातून विविध औद्योगिक, शेतकरी व ग्राहक संघटना व वीज ग्राहकां‍कडून आयोगाकडे १५ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती दाखल करण्यात येणार आहेत. त्यानंतर २८ फेब्रुवारीला दरवाढ प्रस्तावाची होळी करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Electricity
Electricity Price Hike : रेकॉर्ड ब्रेक दरवाढीला लावा ब्रेक

प्रस्‍तावित वीज दरवाढीविरोधात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्‍य वीज ग्राहक संघटनेकडून २५ फेब्रुवारीपर्यंत सभा, मेळावे, बैठका, बोडर्स, बॅनर्स, हॅण्डबिल, तसेच सोशल मीडियाच्‍या माध्यमातून प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.

त्‍याचबरोबर आमदार, खासदार व मंत्री यांचे समक्ष भेट घेऊन दरवाढ व रद्द करणे का आवश्यक आहे, याची माहिती दिली जाईल.

वीज दरवाढीच्‍या विरोधात २८ फेब्रुवारीला दरवाढ प्रस्‍तावाचे होळी आंदोलन केले जाईल. वीज ग्राहकांनी या दरवाढ विरोधी आंदोलनात सहभागी व्‍हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्‍य वीज ग्राहक संघटनेने केले आहे.

Electricity
Agriculture Electricity : शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनची तोडणी थांबवा

दरवाढीवर आक्षेप अथवा हरकत घ्यायची असल्‍यास महाराष्ट्र राज्‍य विद्युत नियामक आयोगाच्‍या संकेतस्‍थळाला भेट देऊन ऑनलाइन आक्षेप नोंदविला येणार आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्‍य विद्युत नियामक आयोगाच्‍या ई-मेलवर ही आक्षेप व हरकती पाठविता येणार आहे.

...अशी आहे दरवाढ

युनिट संख्या सध्याचे दर २०२३-२४ २०२४-२५

० ते १०० युनिट ३.३६ ४.५० ५.१०

१०१ ते ३०० ७.३४ १०.०० ११.५०

३०१ ते ५०० १०.३७ १४.२० १६.३०

५०१ ते पेक्षा जास्‍त ११.८६ १६.३० १८.७०

महावितरणचे सध्याचे दर देशातील सर्वाधिक असताना आणखी दरवाढ करण्याचा प्रस्‍ताव दाखल करणे हे सर्वसामान्‍य घरगुती व्‍यावसायिक ग्राहकांना शॉक देणारे आहेत. या प्रस्‍तावित दरवाढीच्‍या मागणीला राज्‍यभरातून वीज ग्राहक व विविध औद्योगिक, शेतकरी, रहिवासी व ग्राहक संघटनांनी तीव्र विरोध केला पाहिजे.

- प्रमोद खंडागळे, जिल्‍हाध्यक्ष, वीज ग्राहक व औद्योगिक संघटना, खामगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com