Rabi Sowing : रब्बी हंगामात दोन लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

हिंगोली जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात २ लाख २ हजार ६५५ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. त्यानुसार ६६ हजार ७२४ क्विंटल बियाण्याची आणि ६४ हजार टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात (Rabi Sowing) २ लाख २ हजार ६५५ हेक्टरवर पेरणी (Rabi Sowing) प्रस्तावित आहे. त्यानुसार ६६ हजार ७२४ क्विंटल बियाण्याची (Seed) आणि ६४ हजार टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीच्या क्षेत्रात १५ हजार ४३८ हेक्टरने वाढ होण्याचा अंदाज आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : रब्बीसाठी २ लाख ४४ हजार हेक्टरवर नियोजन

गतवर्षी २०२१-२२ रब्बी हंगामात जिल्ह्यात १ लाख ८७ हजार २१७ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. गतवर्षी हरभऱ्याची १ लाख २९ हजार २४० हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा १ लाख ४४ हजार २४० हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी प्रस्तावित आहे. हरभरा, करईडच्या क्षेत्रात वाढ प्रस्तावित आहे. परंतु ज्वारी, गहू या पिकांचे क्षेत्र गतवर्षीएवढेच राहण्याची शक्यता आहे.

६६ हजार क्विंटल बियाण्याची मागणी

गतवर्षी ५८ हजार १७२ क्विंटल बियाण्याची विक्री झाली होती. २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत सरासरी ५६ हजार १७२ क्विंटल बियाण्याची विक्री झाली. यंदाच्या रब्बी हंगामातील बियाणे बदलाच्या प्रमाणानुसार विविध पिकांच्या ६६ हजार ७२४ क्विटंल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यात ‘महाबीज’कडे ५९ हजार ७४३ क्विंटल आणि खासगी कंपन्यांकडे ६ हजार ९८१ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : रब्बी हंगामासाठी अनुदानावर मिळणार बियाणे

४१ हजार टन खतसाठा मंजूर

रब्बी हंगामातील खतांचा सरासरी वापर ५१ हजार १८५ टन आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत विविध ग्रेडच्या ६४ हजार ६ टन खतांची मागणी करण्यात आलेली आहे. परंतु आयुक्तालयाकडून ४१ हजार ६९० टन खतसाठा मंजूर करण्यात आला. त्यात युरिया १२ हजार २६० टन, डीएपी ६ हजार ७९० टन, पोटॅश १ हजार ९९० टन, सुपर फॉस्फेट ५ हजार ८२० टन, संयुक्त खते (एनपीके) १४ हजार ८३० टन या खतांचा समावेश आहे.

पीकनिहाय प्रस्तावित क्षेत्र (हेक्टरमध्ये), बियाणे मागणी (क्विंटलमध्ये)

पीक प्रस्तावित क्षेत्र बियाणे

हरभरा १४४२४० ४३२७२

करडई ७०० ७०

सूर्यफूल ५१ ५. १

ज्वारी १०४२७ ७५०

गहू ४४१४४ २२०७२

मका ८६८ १३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com