कांदा, फळे मोफत वाटून शासनाचा निषेध

पुणतांब्यातील आंदोलनाचा दुसरा दिवस
कांदा, फळे मोफत वाटून शासनाचा निषेध
Puntamba Farmer ProtestAgrowon

पुणतांबा, ता. राहाता : शेतकरी प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे पुणतांबा (ता. राहता) येथे धरणे आंदोलन (Protest) सुरू आहे. या आंदोलनात (Farmer Protest) गुरुवारी (ता.२) कार्यकर्त्यांनी कांदा (Onion) व इतर फळांचे मोफत (fruit Distribution) वाटप करून सरकारचा निषेध केला.

राज्यात शेतकरी प्रश्‍न अत्यंत गंभीर होत आहे. ऊस कांदा व इतर शेतमालाची अवस्था दयनीय झाली आहे. शेतीमालाला दर नसल्याने शेतकरी हतबल आहेत. शेती प्रश्‍न सोडविण्याऐवजी केंद्र व राज्य शासन एकमेकांवर चालढकल करत मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील किसान क्रांतीच्या नेत्यांनी व गावकऱ्यांनी बुधवारपासून (ता.१) धरणे आंदोलन सुरू केले आहे. धरणे आंदोलनाचा गुरुवारी दुसरा दिवस होता.

शासन मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा निषेध म्हणून गावकरी, कार्यकर्त्यांनी कांदा, द्राक्ष, कलिंगडाचे नागरिकांना मोफत वाटप केले. पाच तारखेपर्यंत हे धरणे आंदोलन सुरू राहील. त्यानंतरही शासनाने दखल घेतली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

दुधाचे भाव, शेतातील शिल्लक ऊस, कांद्याचे भाव आणि पिकांना हमीभाव यासारख्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मागच्या आठवड्यात पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी ग्रामसभेत १६ ठराव पास केले होते. राज्य सरकारला ग्रामस्थांनी या ठरावाचे निवेदन पाठवले होते. आणि त्याचबरोबर राज्य सरकारने ग्रामस्थांशी संपर्क केला नाही, तर १ जूनपासून ५ जूनपर्यंत सकाळी ९ ते संध्याकाळी ७ आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. मात्र आठवड्याभरात आघाडी सरकारने ग्रामस्थांशी संपर्क केला नाही, त्यामुळे ठरावानुसार ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेतः

 • शिल्लक उसाला दर हेक्टरी २ लाख अनुदान

 • उसाला एकरी एक हजार रुपये अनुदान

 • कांद्याला प्रति क्विंटल पाचशे रुपये अनुदान

 • कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव

 • शेतकऱ्यांना दिवसभर वीज

 • कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी

 • सर्व पिकांना आधारभूत किंमत मिळावी, त्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करावा

 • २०१७ साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी

 • नियमित कर्ज भरणाऱ्यांना अनुदान

 • उसाप्रमाणे दुधाला हमीभाव

 • दुधाला कमीत कमी ४० रुपये दर

 • खासगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी

 • वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान झाल्यास भरपाई

 • मागील वेळी शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत

पुणतांब्यातील ग्रामस्थांनी २०१७ मध्ये शेतकरी आंदोलन सुरू केले होते. हळूहळू ते आंदोलन महाराष्ट्रभर पसरले होते. त्यावेळी आंदोलनाची राज्य आणि केंद्र सरकारलाही दखल घ्यावी लागली होती. आता पुन्हा एकदा पुणतांब्यातील ग्रामस्थांनी आंदोलाचा पवित्रा घेतला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com