Orange Growers : संत्रा रस्त्यावर फेकत शासनाचा निषेध

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्शी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा नेण्यात आला.
Orange Growers
Orange GrowersAgrowon

अमरावती : संत्रा उत्पादक (Orange Grower Farmers) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्शी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा नेण्यात आला. या वेळी संत्रा रस्त्यावर फेकून सरकारचा मंगळवारी (ता. २९) निषेध करण्यात आला.

Orange Growers
Farmer Protest : आंदोलकाचा मृत्यू; तरीही राज्य सरकार घेईना दखल

दर्जेदार रोपांच्या पुरवठ्याअभावी संत्रापट्ट्यात अनेक समस्यांनी थैमान घातले आहे. शेतकऱ्यांवर बागा काढून टाकण्याची वेळ आली आहे. गेल्या काही वर्षांत संत्रा बागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने फळगळतीच्या समस्येलाही शेतकरी सामोरे जात आहेत. प्रक्रिया उद्योगांचा अभाव असल्याने संत्रा फळांना हंगामात अपेक्षित दरही मिळत नाही. गेल्या काही वर्षांत संत्रा फळांची गळ झाल्यानंतरही संत्रा उत्पादकांकडून वारंवार मागणी होऊ नये त्यांना भरपाई देण्यात आली नाही. तांत्रिक कारणांचा हवाला त्यामागे देण्यात आला.

संत्रा साठवणुकीसाठी कोल्ड स्टोअरेज मिळावे, कापसाचे आयात शुल्क पूर्वीप्रमाणे ११ टक्के करावे, वरूड-मोर्शी तालुका ड्रायझोन करण्यात यावा, मागील वर्षीचा व चालू वर्षीचा शंभर टक्के पीकविमा मिळावा. त्यासाठी विमा कंपन्यांना बाध्य करण्यात यावे. कृषिपंपाचे वीजबिल तत्काळ माफ करून अनेक वर्षांपासून रखडलेल्या वीज जोडण्या तत्काळ देण्यात याव्या, संत्र्या सोबतच मोर्शी, वरुड भागात पारंपरिक पिकांचेही संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे नुकसान झाले.

या नुकसानीनंतरही अनेक शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित ठेवण्यात आले. मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्यामुळे शेतात पाणी घुसून पिके खरडून गेली. हताश शेतकऱ्यांवर आत्महत्येची व उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. या सर्व प्रकारची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ताहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. उपविभागीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

या मागण्यांची पूर्तता न झाल्यास येत्या काळात हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानीने दिला आहे. मोर्चादरम्यान रस्त्यावर संत्रा फेकून जोरदार नारेबाजी करण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अमित आढाव यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर हे या आंदोलनात सहभागी झाले होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com