कृषी सेवा वर्ग २ अधिकाऱ्यांचे धरणे आंदोलन

शासनाने या प्रश्नावर तातडीने महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग दोन राजपत्रित अधिकारी कल्याणकारी संघटनेस चर्चेस बोलवून तोडगा काढावा, अशी मागणी या वेळी अधिकाऱ्यांनी केली.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

कोल्हापूर : वर्ग २ संवर्गाची सेवा ज्येष्ठता सूचि १५ दिवसांच्या कालबद्ध वेळेत अंतिम करून पदोन्नतीची (Promotion) प्रक्रिया तातडीने राबवावी, यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर विभागातील (कोल्हापूर, सांगली, सातारा) कृषी सेवा संवर्ग २ च्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी (Agri Officers) विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन (Dharana Agitation) केले.

Agriculture Department
Agriculture : ‘कृषी सेवा वर्ग-२’ संघटना विविध मागण्यांवरून आक्रमक

या वेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले. शासनाने या प्रश्नावर तातडीने महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग दोन राजपत्रित अधिकारी कल्याणकारी संघटनेस चर्चेस बोलवून तोडगा काढावा, अशी मागणी या वेळी अधिकाऱ्यांनी केली. २५-३० वर्षे सेवा काळ होऊनही पदोन्नती झाली नाही ही बाब अन्यायकारक असून मानसिक व आर्थिक खच्चीकरण करणारी असल्याचे अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले.

कृषी उपसंचालक संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करून पदोन्नती सरळसेवा भरतीचे प्रमाण सध्याचे ५०:५० ऐवजी ७५:२५ करून त्या प्रमाणे एमपीएससीद्वारे पदभरती व्हावी यासह विविध मागण्या या वेळी करण्यात आल्या. अध्यक्ष बंडा कुंभार, रामचंद्र धायगुडे, खालिद मोमीन, अरुण भिंगारदिवे, गणेश भोसले, पोपट पाटील आदींसह तिन्ही जिल्ह्यांतील अधिकारी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com