Kukadi Water : कुकडी प्रकल्पाच्या हक्काच्या पाण्यासाठी ठिय्या

Kukadi Water Project Protest : दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी आमदार अतुल बेनके आणि आशा बुचके यांच्या माध्यमतून संपर्क करण्यात आला असता, २५ मे रोजी पुण्यात बैठक घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले.
Kukadi Water
Kukadi WaterAgrowon

Pune News : कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपाचे फेरनियोजन करून जुन्नर तालुक्यातील आणे पठारावरील आणे, आनंदवाडी, पेमदरा, शिंदेवाडी, व्हरुंडी, नळवणे या अवर्षणग्रस्त गावांना उपसासिंचनाद्वारे पाणी मिळावे, मंजुरी मिळालेल्या वडज उजव्या कालव्याचे काम पूर्ण करावे, या प्रमुख मागण्यांसह शेतकरी संघटना, आणे पठार विकास संस्था, किसान संघ यांच्या वतीने येडगाव धरण जलाशयाजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी आमदार अतुल बेनके आणि आशा बुचके यांच्या माध्यमतून संपर्क करण्यात आला असता, २५ मे रोजी पुण्यात बैठक घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले. त्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, शेतकरी संघटनेचे संघटक अंबादास हांडे, तालुकाध्यक्ष संजय भुजबळ, अजित वाघ, युवा अध्यक्ष प्रमोद खांडगे, किसान संघाचे अध्यक्ष डॉ. दत्ता खोमणे, उपसरपंच बाळासाहेब दाते, तुषार आहेर, सरपंच (आणे) प्रियांका दाते, सरपंच (नळावणे) अर्चना उबाळे, अशोक दाते, बाबाजी शिंदे, प्रशांत दाते, तुषार देशमुख यांच्यासह आणे पठारावरील विविध गावचे शेतकरी उपस्थित होते. ठिय्या आंदोलनात महिला शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

Kukadi Water
Kukadi Canal : कुकडी डावा कालवा दुरुस्तीची गरज

या वेळी प्रियांका दाते, अर्चना उबाळे व बाळासाहेब दाते म्हणाले, ‘‘जुन्नर तालुक्यातील कुकडी प्रकल्पाचे पाणी २५० किलोमीटर अंतरावर असलेल्या पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या तालुक्यांना जाते.

मात्र कुकडी प्रकल्पापासून ३५ किलोमीटर असलेल्या अवर्षणग्रस्त आणे पठारावरील गावांना मिळत नाही. कुकडीच्या पाण्यासाठी मागील चाळीस वर्षे आम्ही संघर्ष करत आहोत. निवडणुकांमध्ये फक्त आश्‍वासन दिले जाते. याबाबत निर्णय न झाल्यास पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल.’’

Kukadi Water
Kukadi Water Issue : जुन्नर येथे कुकडीच्या पाणी प्रश्‍नावर सर्वपक्षीय मोर्चा

अंबादास हांडे व संजय भुजबळ म्हणाले, ‘‘कुकडी प्रकल्पाच्या पाणीवाटपाचे फेरनियोजन करून जुन्नर तालुक्यातील आणे पठार व पिंपरी पेंढार, बेल्हे परिसरातील वंचित गावांना सिंचनासाठी पाणी मिळावे, तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कुकडी प्रकल्पात समाविष्ट करावेत, नियोजित डिंभा ते माणिकडोह बोगदा संपूर्ण संचय पाणी पातळीपासून करावा, डिंभे धरणाचे पाणी वडज धरणात सोडावे, या मागण्यासाठी शेतकरी संघटना पाठपुरावा करत आहे.’’

दरम्यान, सोमवारी (ता. २२) सायंकाळी चार वाजता आमदार अतुल बेनके, भाजप नेत्या आशा बुचके, माजी आमदार बाळासाहेब दांगट, कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.

कुकडी प्रकल्प तालुक्यात असूनही तालुक्यातील १६ गावांतील सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्र पाण्यापासून वंचित आहे. या गावांना पाणी मिळण्यासाठी सर्व्हे करून कुकडी प्रकल्प पाणीवाटपाचे फेरनियोजन करणे आवश्यक आहे. ही कामे मार्गी लावण्यासाठी शासनाची मंजुरी आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी समवेत २५ मे रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत बैठक होणार आहे. हा प्रश्‍न सुटला नाही तर या पुढील आंदोलनात मी शेतकऱ्यांसोबत राहणार आहे.
- अतुल बेनके, आमदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com