Loan Recovery : कर्जवसुली विरोधात मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन

१६ जानेवारीला कुटुंबासह मालेगावात ठिय्या
Andolan
AndolanAgrowon

वणी, ता. दिंडोरी : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या जुलमी कर्ज वसुलीच्या विरोधात व कर्जाला योग्य व्याज दर (Intrest Rate) लावून राष्ट्रीय बँकेप्रमाणे ओटीएस योजना (OTS Scheme) मागणीसाठी १६ जानेवारी २०२३ रोजी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या निवासस्थानासमोर बिऱ्हाड व ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय वणी येथे शेतकरी संघटना व कर्जदार शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. संदीप जगताप यांनी दिली.

Andolan
Loan Recovery : शेतकऱ्यांकडील सर्व कर्जवसुलीला स्थगिती द्या

वणी (ता.दिंडोरी) येथील खंडेराव महाराज पटांगणावर रविवारी (ता.२५) नाशिक जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलनाच्या नियोजन ठरविण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस जिल्ह्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

Andolan
Loan Recovery : शेतकऱ्यांकडील सर्व कर्जवसुलीला स्थगिती द्या

शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला वसंत कावळे, विलास भवर, राजू शिरसाठ, नाना गुंजाळ, भास्करराव जाधव, अॅड. सुनील जावळे, कैलास खांडबहाले, तानाजी गायकर, अमृता पवार, रमेश पवार, किरण तिवारी, सुनील दवंगे, नितीन आहेर आदींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनासाठी गावोगावी जनजागृती करून मोठ्या संख्येने शेतकरी बिऱ्हाड आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com