Warehouse Corporation : वखार महामंडळ महासंघाचे तिसऱ्या दिवशी उपोषण सुरूच

महामंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या खर्चावर देखील महासंघाने आक्षेप घेतला आहे.
Warehouse Corporation
Warehouse CorporationAgrowon

Pune News महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या (Warehouse Corporation) व्यवस्थापनाला कर्मचारी महासंघाने लाक्षणिक उपोषणाची (Protest) नोटीस दिली आहे. तसेच व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत गाडीवान (Shrikant Gadiwan) यांनी केला.

Warehouse Corporation
Warehousing Corporation : वखार महामंडळाचे ‘वखार आपल्या दारी’ अभियान

महाराष्ट्र स्टेट वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन कर्मचारी महासंघाच्या वतीने ९ मार्चपासून लाक्षणिक उपोषण सुरुवात केली आहे. कोरोना कालावधीत कर्मचाऱ्यांनी गहू-तांदूळ सार्वजनिक वितरणाची सेवा बजावली.

Warehouse Corporation
Agricultural Warehouse : वखार केंद्राची सुरक्षा योजना महत्त्वाची...

किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदी साठ्याबाबत कर्तव्य पार पाडूनही प्रशासन कर्मचाऱ्यांच्या अडचणींबाबत दखल घेत नाही, अशी खंत महासंघाकडून व्यक्त करण्यात आली.

तसेच, महामंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या खर्चावर देखील महासंघाने आक्षेप घेतला आहे. महामंडळाने मुख्यालयात अत्याधुनिक बैठक व्यवस्था केली असतानादेखील पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक घेऊन वारेमाप खर्च केल्याचा आरोप महासंघाने केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com