Diwali Buldhana Protest : बुलडाण्यात दिवाळीच्या दिवशी आंदोलने

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेचा-भाकर आंदोलन
Diwali Buldhana Protest
Diwali Buldhana ProtestAgrowon

बुलडाणा ः शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिवाळीच्या दिवशी सोमवारी (ता. २४) जिल्ह्यात विरोधी पक्ष, संघटनांनी लक्ष्यवेधी आंदोलने केली. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Buldhana Collectors Office) राष्‍ट्रवादी काँग्रेस (Rashtrawadi Congress) पक्षातर्फे ठेचा-भाकर आंदोलन झाले. तर जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत मिळण्यासाठी विषारी कीटकनाशकांच्या बाटल्या हातात घेऊन अर्धनग्न आंदोलन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेचा भाकर आंदोलनाचे करण्यात आले. यावर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्याचे संपूर्ण पीक उद्‌ध्वस्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न तर सोडाच परंतु केलेला खर्चही निघालेला नाही. बँकेचे कर्ज, उसनवार, रोजचा खर्च कसा भागवायचा या विवंचनेत शेतकरी आहे.

सरकारने अशा परिस्थितीमध्ये दिलासा देणे गरजेचे आहे. परंतु सरकार आपांपसातील भांडणे आणि गटबाजीमध्ये व्यस्त आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, माजी जिल्हाध्यक्ष साहेबराव सरदार, टी. डी. अंभोरे पाटील, विधानसभाध्यक्ष नरेश शेळके, सहकार सेल जिल्हाध्यक्ष पी. एम. जाधव, किसान सभा जिल्हाध्यक्ष राजीव जावळे यांच्यासह पदाधिकारी सहभागी होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com