Pokhara Project Electricity : पोखरा प्रकल्पातील गावांना २४ तास वीजपुरवठा द्या

आमदार प्रवीण पोटे पाटील यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
Electricity
ElectricityAgrowon

अमरावती : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) अंतर्गत गावांमध्ये कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Electricity
गडचिरोलीत कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा करा

पत्रानुसार, वातावरणातील बदल, त्यामुळे अनिश्चित पाऊसमान अशा स्थितीत शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने शेती करणे अवघड झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पावसाचा ताण सहन करणाऱ्या वाणांची मागणी केली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने देखील अशा वाणांच्या संशोधनावर नजीकच्या काळात भर दिला आहे. ही जमेची बाजू असली तरी जागतिक बँकेच्या निधीतून हवामानातील बदल नजरेसमोर ठेवत पोखरा प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. या प्रकल्पाच्या निधीतून शेतकऱ्यांनी अनेक कृषिपूरक उद्योग उभारले, काही शेतकऱ्यांनी कृषिपंप तसेच सिंचनाच्या सोयी सुविधा बळकट केल्या आहेत.

Electricity
पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन आता २४ तास घेता येणार

मात्र अशा घटकांना पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांसाठी प्रकल्पातील या बाबींचा उपयोग करणे अवघड झाले आहे. राज्यात पोखरा अंतर्गत ५१४२ गावांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील खारपाणपट्टा क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ५३२ गावे प्रकल्पात समावेशित करण्यात आली. खारपाणपट्ट्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांना स्वावलंबी करता यावे व यातून त्यांचे कल्याण साधले जावे याकरिता २४ तास वीज द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com