Crop Insurance : नुकसानग्रस्तांना २५ टक्के पीकविमा अग्रिम द्या

बीड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे जे नुकसान झाले, त्याची भरपाई इतर जिल्ह्यांप्रमाणे द्या. यासह पावसातील खंडामुळे विमा संरक्षित पिकांना २५ टक्के अग्रिम रक्कम सर्वच मंडलांना द्या, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात शुक्रवारी (ता १६) हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon

बीड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे जे नुकसान (Heavy Rain Crop Damage) झाले, त्याची भरपाई (Crop Damage Compensation) इतर जिल्ह्यांप्रमाणे द्या. यासह पावसातील खंडामुळे विमा संरक्षित पिकांना २५ टक्के अग्रिम रक्कम सर्वच मंडलांना द्या, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात शुक्रवारी (ता १६) हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा मिळण्यासाठी ‘स्वाभिमानी’ची बोंबा-बोंब

किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे, कॉ. काशिराम शिरसाट, कॉ. मुरलीधर नागरगोजे, पांडुरंग राठोड, कॉ. दत्ता डाके, गंगाधर पोटभरे, विष्णू देशमुख, जगदीश फरताडे, भगवान बडे, कृष्णा सोळंके, दादासाहेब शिरसाट, ॲड. संजय चोले, डॉ. सावळाराम उबाळे आदींच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन दिले. २०२० चा खरीप पीकविमा द्यावा. जनावरांना लम्पी स्कीनचे लसीकरण करा. दगावलेल्या जनावरांसाठी मदत करा, आदी मागण्या शेतकऱ्यांनी केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com