Crop Damage Compensation : अतिवृष्टिबाधितांना सरसकट मदत द्या

हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२२) जुलै महिन्यातील अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे बाधित २ लाख ६५ हजार ९७६ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २८७ कोटी ४ लाख ५७ हजार ६०० रुपये निधी मिळणे अपेक्षित आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२२) जुलै महिन्यातील अतिवृष्टी (Heavy Rain) आणि सततच्या पावसामुळे बाधित (Rain Affected) २ लाख ६५ हजार ९७६ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २८७ कोटी ४ लाख ५७ हजार ६०० रुपये निधी मिळणे अपेक्षित आहे. परंतु शासनाने शेतीपीक नुकनासीबद्दल (Crop Damage Compensation) १ लाख २५ हजार ५७५ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १५७ कोटी ४ लाख ५२ हजार रुपये निधी मंजूर केला आहे. त्यात पुरामुळे जमिनी खरडून गेलेल्या क्षेत्राचा मदतीत समावेश नाही.

Crop Damage
Crop Damage Survey : अतिवृष्टी होऊनही पंचनाम्यांकडे काणाडोळा

पीक नुकसानीच्या मदतीतून अनेक मंडलांतील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्ष शेतावर जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत.

कळमनुरी तालुक्यातील बाधित क्षेत्र आणि शेतकरी संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर बाधित क्षेत्रात वसमत, सेनगाव, हिंगोली, औंढा नागनाथ तालुक्यांचा क्रम आहे. वाढीव दरानुसार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २८७ कोटी ४ लाख ५७ हजार ६०० रुपये निधी मिळणे अपेक्षित आहे. परंतु शासनाने १ लाख ३३ हजार ९७० शेतकऱ्यांच्या १ लाख १३ हजार ६२० हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीबद्दल १५७ कोटी ४ लाख ५२ हजार रुपये निधी मंजूर केला आहे. कयाधू नदी काठच्या हिंगोली, कळमनुरी तालुक्यांतील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरल्यामुळे पिके वाहून गेली.

Crop Damage
Crop Damage Compensation : अखेर पीक नुकसानीचे १००८ कोटी आले

जमिनी खरडून गेल्यामुळे मातीचा सुपीक थर वाहून गेला आहे. खरडून गेलेल्या जमिनी नापिक झाल्या आहेत. त्यामुळे नदी काठच्या शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम विमा भरपाई देण्याची मागणी केली आहे. कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांतील अनेक मंडलांतील शेतकऱ्यांचा मदतीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी आंदोलन केली जात आहेत.

झालेले नुकसान असे...

हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२२) जून जुलै महिन्यातील अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे मिळून एकूण २ लाख ६५ हजार ९७६ शेतकऱ्यांच्या २ लाख ८ हजार ७१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे जिरायती क्षेत्रावरील १ लाख १५ हजार ५७५ शेतकऱ्यांच्या १ लाख ११ हजार ७४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे झाले आहे. बागायती क्षेत्रात ८ हजार २२७ शेतकऱ्यांचे १ हजार ८५७ हेक्टर, फळपिकांचे १६८ शेतकऱ्यांच्या १५ हेक्टरचा नुकसानीत समावेश आहे. सततच्या पावसामुळे एकूण ९६ हजार ६७७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात जिरायती क्षेत्र ९६ हजार १७८ हेक्टर आणि बागायतील क्षेत्रातील ४९९ हेक्टरचा समावेश आहे.

कयाधू नदीच्या पुरामुळे अडीच एकर सुपीक मातीचा थर वाहून गेला. परंतु प्रशासनाने खरडून गेल्याचे नुकसान दर्शविले नाही. प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करावेत. जमीन खरडून गेलेल्या सर्व शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी. पूरहानी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
अक्षय देशमुख, कसबे घावंडा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com