शेतीमाल साठवणुकीच्या अत्याधुनिक सेवा द्या: अनिल कवडे

शेतकऱ्यांना शेती करताना भांडवल (Capital) हवे असते. अशा काळात सावकारांकडे जाण्याऐवजी स्वतःच्याच शेतीमालावरील तारण कर्ज (Mortgage loan on agricultural property) हे रास्त दरात मिळते.
Agricultural Storage
Agricultural StorageAgrowon

पुणेः ‘‘शेतीमालाचे दर बाजारपेठेतील आवक आणि मागणीवर अवलंबून असतात. काढणी हंगामात बाजारपेठेतील अचानक वाढणाऱ्या आवकेमुळे बाजारभाव (Market rate) कोसळतात. या परिस्थितीत शेतमाल साठवणूक आणि त्यावर अल्प व्याजावरील तारण कर्ज योजना ही शेतकऱ्यांचे नुकसान कमी करणारी आहे. वखार महामंडळाने माहिती तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकऱ्यांना शेतीमाल साठवणुकीच्या अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून द्याव्यात,’’ अशी अपेक्षा सहकार आयुक्त अनिल कवडे (Anil Kavade) यांनी व्यक्त केली.

राज्य वखार महामंडळाचा ६५ वा वर्धापन दिन कार्यक्रमात सोमवारी (ता. ८) कवडे बोलत होते. या वेळी पणन संचालक सुनील पवार, ‘पीएमआरडीएचे’ आयुक्त सुहास दिवसे, महामंडळाचे माजी अध्यक्ष विश्वास भोसले, ‘नाफेड’चे पुनीत सिंग, महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे, सह व्यवस्थापकीय संचालक रमेश शिंगटे उपस्थित होते.

कवडे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना शेती करताना भांडवल (Capital) हवे असते. अशा काळात सावकारांकडे जाण्याऐवजी स्वतःच्याच शेतीमालावरील तारण कर्ज (Mortgage loan on agricultural property) हे रास्त दरात मिळते. भांडवल उपलब्ध होऊन शेतीमालाला योग्य दर मिळाल्यावर विक्री केल्यास दुहेरी फायदा होतो. ही योजना अधिक मोठ्या प्रमाणात राबविणे गरजेचे आहे.’’

पवार म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे म्हणजे केवळ बाजारभाव वाढण्याने ते साध्य होणार नाही. देशात शेतीमाल काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाअभावी सव्वा लाख कोटी रुपयांचा भाजीपाला (Vegetables) व फळे (Fruits) आपण फेकून देतो. महाराष्ट्रातील यातील आकडा ३५ ते ४० हजार कोटींचा आहे. साठवणुकीची पुरेशी व्यवस्था केली. उत्पादन वाढविले. निविष्ठांचा खर्च कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू शकतो. याकामी वखार महामंडळाचे काम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.’’

तावरे म्हणाले, ‘‘संगणकीय शेतीमाल तारण कर्ज योजना (ब्लॉकचेन) राबविण्यात महामंडळ अग्रगण्य आहे. शेतकऱ्यांना तारण कर्जाची मंजुरी व वितरण २४ तासांत केले जाते. सध्या २ हजार ३२३ शेतकऱ्यांना ५१ कोटी २५ लाख रुपयांचे शेतीमाल तारण कर्ज दिले आहे.’’

ब्लॉकचेनद्वारे शेतीमाल तारण कर्ज वितरण हे आव्हान स्वीकारून वखार महामंडळाने ते यशस्वी केले. त्यात राज्यातच नव्हे तर देशातील ते पहिले महामंडळ ठरले. गोदामांसह अन्य सेवा-सुविधांद्वारे कामकाजात व्यावसायिकता आणल्यास महामंडळाच्या व्यवसाय आणि नफ्यात मोठी वाढ होईल.

- सुहास दिवसे, आयुक्त, ‘पीएमआरडीए’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com