Ujani Canal : उजनी कालव्याच्या दुरुस्तीसाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद हवी

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या कालवा दुरुस्तीसाठी तरतूद केलेली २९ कोटी रुपयांची तरतूद ही अपुरी आहे.
Ujani Canal
Ujani CanalAgrowon

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या कालवा (Ujani Dam Canal) दुरुस्तीसाठी तरतूद केलेली २९ कोटी रुपयांची तरतूद ही अपुरी आहे. या कालवादुरुस्तीसाठी (Canal Repairing) किमान शंभर कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे केली आहे.

Ujani Canal
Ujani Dam : उजनी धरण अखेर शंभर टक्के भरले

राज्यातील सर्वांत मोठे धरण असलेल्या उजनी धरणाची पाणी साठवणक्षमता १२३ टीएमसी एवढी आहे. सर्वाधिक जुने असे ही धरण आहे. मुख्य कालवा, उजवा कालवा, डावा कालवा, बेगमपूर शाखा कालवा, कुरूल कालवा, मोहोळ कालवा यासह वितरिका, उपवितरिका यांची लांबी सुमारे २१०० किलोमीटर आहे.

Ujani Canal
Ujani Dam : उजनी धरणाची पाणी पातळी ७० टक्क्यांकडे

तसेच या कालव्यांवर ६० जलसेतू, १७३४ पूल, काही मोऱ्या, याशिवाय फुटबीज, रेल्वे क्रॉसिंग, फॉल्स आदी लहान मोठ्या बांधकामांची संख्या ९२२० इतकी आहे. मात्र कालव्याच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने केलेली २९ कोटी रुपयांची तरतूद कमी आहे. एकूण गळती आणि दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चाचा विचार करता ही रक्कम अपुरी आहे. त्यामुळे किमान शंभर कोटीची गरज आहे, असे आमदार देशमुख यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

पाच टीएमसी पाणी वाया

धरणाच्या कालव्याला आज अनेक ठिकाणी गळती लागली आहे. काही ठिकाणी कालव्यांना भेगाही पडल्या आहेत. कालव्याच्या या गळतीमुळे किमान पाच टीएमसी पाणी दरवर्षी वाया जात आहे, याकडेही आमदार देशमुख यांनी त्यांच्या निवेदनात लक्ष वेधले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com