Women Empowerment : बचत गट उत्पादनांच्या ब्रँडिगसाठी ‘डीपीसी’तून तरतूद करू ः विखे

महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कायम आहे. आज अनेक महिला यातून व्यावसायिक म्हणून उभ्या राहिल्या आहेत. त्यांना भविष्यात अडचण येणार नाही.
Radhakrushna Vikhe Patil
Radhakrushna Vikhe PatilAgrowon

सोलापूर : संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य (Millet Year) वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे महिला बचत गटांनी (Women Empowerment) तृणधान्यपासून केलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलच्या माध्यमातून तृणधान्य पिकांतील (Millet Crop) पोषणमूल्ये व त्यांचे मानवी आहारातील महत्त्व जनमाणसांत पोहोचण्यास मदत होईल.

त्यासाठी बचत गटांच्या उत्पादनाचे ब्रँडिग होणे आवश्यक आहे. जिल्हा नियोजन समितीतून त्यासाठी आर्थिक तरतूद करू, अशी ग्वाही महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी येथे दिली.

जिल्हा नियोजन भवन आवारात महिला बचत गटांनी तृणधान्यपासून केलेल्या खाद्यपदार्थांचे प्रदर्शनाला नुकतीच पालकमंत्री विखे पाटील यांनी भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक श्री. मोरे आदीसह अन्य मान्यवर महिला बचत गटाचे प्रतिनिधी उपस्थित होत्या.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, की महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कायम आहे. आज अनेक महिला यातून व्यावसायिक म्हणून उभ्या राहिल्या आहेत. त्यांना भविष्यात अडचण येणार नाही, असेही ते म्हणाले.

Radhakrushna Vikhe Patil
माझा जीव, माझी जबाबदारी : राधाकृष्ण विखे

पालकमंत्र्यांच्या हस्ते ट्रॅक्टरचे वितरण

कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. '

यामध्ये उत्तम साठे, किसन साठे, अभिजित मनसावले, श्रीमती वैशाली सरवळे यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.

तसेच नव्याने ट्रॅक्टर व अवजारे खरेदी करण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील दत्तात्रय कोंडीबा दोडतले (औज- आहेरवाडी), शशिकला अप्पासाहेब लाळसंगे (मंद्रुप), सखुबाई अच्युत कोकाटे (अकोलेकाटी), प्रियंका देविदास लामकाने (अकोलेकाटी) आणि अभिमन्यू विभुते (नान्नज) यांना ट्रॅक्टरकरिता, तर सरिता धोंडीबा खराडे (मंद्रूप, ता. द. सोलापूर) यांना पेरणी यंत्राकरिता पूर्वसंमती पत्रवाटप करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com