
Forest Fire News सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग ः ‘सहकार्याची धरू कास, आगीपासून वाचवू वनास’ या संकल्पनेतून जंगलात वणवा (Forest Fire) लागू नये, ही सामाजिक जबाबदारीची जाणीव गावोगावी करून देण्यासाठी येथील वनविभागातर्फे (Forest Department) ‘जंगलात लागणारा वणवा’ याविषयी जनजागृती आणि मार्गदर्शनाचा कार्यक्रम नेमळे पूर्ण प्राथमिक शाळा नेमळे नं. १ मध्ये नुकताच झाला.
यावेळी वनरक्षक रणगीरे यांनी जंगलात वणवे लागू नयेत यासाठी जंगलालगत असणाऱ्या शेतकऱ्यांनी काय खबरदारी घ्यावी तसेच जंगलात फिरायला जाताना अग्नीजन्य वस्तू सोबत घेऊन जाऊ नयेत, कोणत्याही प्रकारे आग लावण्याचा प्रयत्न करू नये. जंगलात गवत किंवा झाडाची मुळे पाणी धरून ठेवतात.
यामुळे विहिरी, बोअरवेल यांचे पाणी वाढते. गवतामुळे डोंगराची माती वाहून जात नाही. जंगलात पेटणाऱ्या वणव्यांचे प्रमाण कमी झाल्यास वन्य प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष मिटून जाईल, असे मार्गदर्शन केले.
यासाठी वनात वणवा लागल्यास तो विझवून टाकावा किंवा वन विभागाला त्वरित कळवावे, असे आवाहनही केले.
यावेळी शाळा नेमळे नं. १ च्या मुख्याध्यापिका सुनिता गावकर, सीमा मोरजकर, श्रेया परब, माजी मुख्याध्यापिका अपर्णा जोशी, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अर्जुन राऊळ, दाजी राऊळ, वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक प्रकाश रणगिरे उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.