Sugarcane Payment : थकित ऊसबिलासाठी टोकाई कारखान्यावर जन आक्रोश मोर्चा

Sugarcane FRP : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकित ऊस देयक तत्काळ अदा करावे, या मागणीसाठी कुरुंदा (ता. वसमत) येथील टोकाई सहकारी कारखान्यावर शनिवारी (ता. १३) दुपारी शेतकऱ्यांचा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.
 Sugarcane Farming
Sugarcane FarmingAgrowon

Hingoli News : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकित ऊस देयक तत्काळ अदा करावे, या मागणीसाठी कुरुंदा (ता. वसमत) येथील टोकाई सहकारी कारखान्यावर शनिवारी (ता. १३) दुपारी शेतकऱ्यांचा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

टोकाई सहकारी कारखान्याकडे कोट्यवधी रुपयांचे ऊस देयक थकित आहेत. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत गाळप केलेल्या उसाला पहिली उचल प्रतिटन २ हजार रुपयेनुसार द्यावी. २०२२-२३ मधील गाळप केलेल्या उसाची उर्वरित एफआरपी द्यावी. थकित ऊस देयकावर १५ टक्के दराने व्याज द्यावे. कर्मचाऱ्याचे थकित पगार द्यावेत.

 Sugarcane Farming
Sugarcane FRP : ‘एफआरपी’ १०९ साखर कारखान्यांनी थकविली

गैरप्रकाराची चौकशी करावी, या मागण्यांसाठी शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी सहकारमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, माजी खासदार सुभाष वानखेडे, शिवाजी माने, शंकरराव खराटे, जी. आर. देशमुख, गोरख पाटील, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा प्रमुख विनायक भिसे, शिवसेना (ठाकरे गट) संपर्क प्रमुख गोपू पाटील,

 Sugarcane Farming
Sugarcane FRP : उसाची एफआरपी १०० रुपयांनी वाढवा

स्वाभिमानी शेतकरी संघटनचे नांदेड जिल्हाध्यक्ष हनुमंत राजगोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिणे, डॉ. धोंडिराम पार्डीकर, चंद्रकांत दळवी, प्रल्हाद राखोडे, बाळासाहेब मगर, शंकरराव कराळे, पांडू शतलवार आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी फोनद्वारे आंदोलकांशी संवाद साधत मागण्यांबाबत लवकरच काहीतरी तोडगा काढू, असे आश्‍वासन दिले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com