Citrus Crop : लिंबूवर्गीय पिकांसंदर्भात ११ पुस्तकांचे प्रकाशन

लिंबूवर्गीय लागवड साहित्याच्या उत्पादनावरील राष्ट्रीय कार्यशाळेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लिंबूवर्गीय पिकाच्या तंत्रज्ञानविषयक ११ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon

नागपूर ः लिंबूवर्गीय लागवड (Citrus Crop Cultivation) साहित्याच्या उत्पादनावरील राष्ट्रीय कार्यशाळेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते लिंबूवर्गीय पिकाच्या तंत्रज्ञानविषयक (Citrus Crop Technology) ११ पुस्तकांचे प्रकाशन (Book On Citrus Crop)करण्यात आले. केंद्रीय मृदा व जमीन उपयोगीता संस्थेच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Nitin Gadkari
अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त लिंबूवर्गीय फळपिकातील उपाययोजना

भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा, लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष, आयसीएआरचे उपमहासंचालक डॉ. एस. के. चौधरी, डॉ. सी. डी. मायी यांची या वेळी उपस्थिती होती.

Nitin Gadkari
लिंबूवर्गीय बागा वाचविण्यासाठी सिट्रस ग्रिनिंग रोगाचे व्यवस्थापन

याच कार्यक्रमात लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या ११ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यामध्ये ग्रेपफ्रूटचे उत्पादन तंत्रज्ञान (सीट्रस पॅराडिसी)आणि पुमेलोचे उत्पादन तंत्रज्ञान (सीट्रस ग्रॅंडिस) या विस्तारित पत्रिकेचे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांतील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. लिंबूवर्गीय फळांपासून मूल्यवर्धित उत्पादनांसाठी तंत्रज्ञान, नागपुरी संत्र्याची सुधारित लागवड, नागपुरी संत्रा पिकातील फळगळ आणि त्याचे व्यवस्थापन अशाप्रकारच्या इंग्रजी आणि मराठी विषयातील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या खासगी सार्वजनिक भागीदारी मॉडेलचे कौतुक केले. या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची रोप उपलब्ध होतील आणि त्याव्दारे संत्रा व इतर लिंबूवर्गीय फळपिकातील कीड-रोगांचे व्यवस्थापन शक्‍य होईल, असा विश्‍वास व्यक्‍त केला. शेतीच्या गुणात्मक उत्कर्षासाठी संस्थेने उत्प्रेरक म्हणून काम करावे. ज्यामुळे बागातयदारांना उत्तम दर्जाचे लागवड साहित्य उपलब्ध होईल. यातूनच त्यांची उत्पादकता आणि उत्पन्न वाढणार असल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com