Pulse Production : खरिपातील कडधान्य उत्पादन घटणार

देशात यंदा खरिपातील कडधान्य उत्पादन सरकारच्या अंदाजापेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे.
Pulse Production
Pulse ProductionAgrowobn

पुणेः देशात यंदा खरिपातील कडधान्य उत्पादन (Kharip Pulse Production)सरकारच्या अंदाजापेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे. मात्र सरकार जास्त आयात करून पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करतंय. त्यामुळं उत्पादन (Kharip Production) कमी राहूनही शेतकऱ्यांच्या मालाला अपेक्षित दर मिळत नाही.

देशात यंदा कडधान्य उत्पादन घटण्याची शक्यता आहे. यंदा खरिपात कडधान्य लागवड कमी झाली. त्यातच सप्टेंबर आणि ऑक्टोब महिन्यात पावसाने पिकाला फटका बसला. याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. यंदा पेरणीच्या काळात केंद्र सरकारने खरिपात १०५ लाख टन कडधान्य उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवले होते. मात्र पहिल्या सुधारित अंदाजात सरकारने ८४ लाख टनांवर खरिपातील कडधान्य उत्पादन स्थिरावेल, असं म्हटलंय.

Pulse Production
Crop Insurance : पीक पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडून वसुली

खरिपातील महत्वाचं कडधान्य असलेल्या तुरीचे उत्पादन यंदा ३९ लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता आहे. तर उडीद आणि मुगाचेही उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. उडीद आणि मुगाची सरकारी खरेदी अनेक राज्यात सुरु आहे. तर नवी तूर डिसेंबरपासून बाजारात येईल. देशातील उत्पादन घटणार म्हणजे शेतकऱ्यांना चांगल्या दराची संधी निर्माण होईल. मात्र सरकार पुरवठा वाढविण्यासाठी आयातीवर जोर देत आहे.

देशात कडधान्याची आयात वाढावी यासाठी केंद्र सरकारने ३१ मार्च २०२३ पर्यंत तूर, उडीद आणि मसूरची आयात मुक्त श्रेणीत ठेवली आहे. तसचे म्यानमानर आणि आफ्रिकी देशातून तूर आणि उडीद आयातीचे करारही केले आहेत. शिवाय ऑस्ट्रेलिया आणि कॅनाडामधून ६ ते ८ लाख टन मसूर आयात होण्याचीही शक्यता आहे. तसेच आफ्रिका आणि म्यानमारमधून तुरीची एव्हढीच आयात होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

केंद्र सरकारने रब्बी हंगामात १९० लाख टन कडधान्य उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवले आहे. यात हरभरा उत्पादन १३५ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज सरकारने व्यक्त केला. शिवाय रब्बीत मसूर आणि वाटाण्याचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असते. मात्र दुसरीकडे सरकारने मूसर आयातीचा धडाका लावला. त्यामुळे याचा परिणाम पेरणीवर होऊ शकतो.

देशात पिकांचे नुकसान होऊन उत्पादन कमी होते. मात्र सरकार आयात करून पुरवठा वाढवते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांसाठी पीक तोट्याचं ठरतं. म्हणून शेतकरी त्या पिकाची पेरणी वाढवत नाहीत आणि शेवटी उत्पादन कमीच राहून आयातीवर अवलंबून राहावं लागतं. शेतकऱ्यांना चांगला दर मिळाल्यास ते उत्पादन वाढवतील आणि देश स्वावलंबी होईल, असे जाणकारांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com