Water Storage : मुसळधार पावसामुळे धरणांत ६३४ टीएमसी पाण्याची आवक

यंदा मॉन्सूनच्या पावसामुळे व परतीच्या पावसाने पुणे जिल्ह्यातील धरणांत मोठ्या प्रमाणात आवक झाली.
11 thousand 735 cusecs discharged from Khadakwasla
11 thousand 735 cusecs discharged from Khadakwasla

पुणे : यंदा मॉन्सूनच्या पावसामुळे (Rain) व परतीच्या पावसाने पुणे जिल्ह्यातील धरणांत (Dam) मोठ्या प्रमाणात आवक झाली. गेल्या पाच महिन्यांत धरणांत ६३४.९३ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली असली तरी धरणांत २०२.१५ टीएमसी एवढाच उपयुक्त पाण्याचा साठा (Water Stock) करण्यात आला आहे. उर्वरित पाण्याचा विसर्ग नद्या, कालव्यांना करण्यात आला आहे.

यंदा हवामान विभागाने पहिल्या टप्प्यात ९९ टक्के, तर दुसऱ्या टप्प्यात १०२ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात १० जूनच्या दरम्यान कमी अधिक पाऊस पडला. मात्र, एक जुलैपासून ते एक नोव्हेंबर या चार महिन्यांच्या काळात पावसाने दमदार हजेरी लावली.

11 thousand 735 cusecs discharged from Khadakwasla
Pune Dam : पुणे जिल्ह्यातील धरणांत २०२ टीएमसी पाणीसाठा

या कालावधीत मुळशी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात व घाटमाथ्यावर सर्वाधिक ७ हजार ६३९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी पाच महिन्यांत ६ हजार ४६४ मिलिमीटर पाऊस पडला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार १५५ मिलिमीटर एवढा अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या काळात मुळशी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल सात हजार ४२१ मिलिमीटर पाऊस पडला होता. इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याची चांगलीच आवक झाली. यंदा पावसाळ्यात सर्व धरणांत मिळून ५४१.२३ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. तर, परतीच्या पावसामुळे ९३ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

यंदा मुळशीच्या पाणलोट क्षेत्रापाठोपाठ टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ३ हजार ५५४ मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या वर्षी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३ हजार ४३ मिलिमीटर पाऊस पडला होता. तर, खडकवासला, शेटफळ, नाझरे, वीर, घोड, विसापूर, उजनी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात एक हजार मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडला आहे. विसापूर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वात कमी पाऊस पडल्याची नोंद झाली.

तर, लोणावळ्याच्या घाटमाथ्यावर चार हजार ८४० मिलिमीटर पाऊस पडला. वळवण येथे ४ हजार ७४ मिलिमीटर, तर ठोकरवाडीत ३ हजार १००, शिरोटा येथे २ हजार ३७१ मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या वर्षी याच घाटमाथ्यावर कमी पाऊस पडला होता. यामध्ये लोणावळा ४ हजार ४३३ मिलिमीटर, वळवण ३ हजार ५९८ मिलिमीटर, ठोकरवाडी २ हजार ७०३, शिरोटा २ हजार २२० मिलिमीटर पाऊस पडला होता.

गेल्या पाच महिन्यांत धरणनिहाय पडलेला पाऊस,

धरण --- पडलेला पाऊस, मिलिमीटर -- आलेला येवा (टीएमसीमध्ये)

टेमघर -- ३५५४ -- ४.८३

वरसगाव -- २६४४ -- १७.४६

पानशेत -- २६४४ -- १५.१६

खडकवासला -- ९३७ -- ३१.४८

पवना --- २७३७ -- १३.१४

कासारसाई -- १२५५-- १.९१

11 thousand 735 cusecs discharged from Khadakwasla
Water Supply Scheme : पाणीपुरवठा योजनेसाठी ३८ कोटी

कळमोडी -- १८५८ -- ५.९०

चासकमान -- १०६४ -- २०.४४

भामा आसखेड -- १२८१ -- १०.४४

आंध्रा -- १६७६ -- ५.४२

वडिवळे -- २८२० -- ३.२९

शेटफळ -- ८७४ -- ०.४२

नाझरे -- ९६९ -- ४.१७

गुंजवणी -- २६३९ -- ६.२६

भाटघर -- ११२१ -- ३२.५८

नीरा देवघर -- २४१३ -- १६.६८

वीर -- ८६४ -- ६०.६६

पिंपळगाव जोगे -- १३२९ -- ९.७३

माणिकडोह -- १५४० -- ९.९९

येडगाव -- १४३० -- १७.९३

वडज -- १०१३ -- ६.३८

डिंभे -- १४९७ -- २२.४५

चिल्हेवाडी -- १०३६ -- ९.५७

घोड -- ५६५ -- ५८.१६

विसापूर -- ३९४ -- ३.२५

उजनी -- ८०४ -- २५६.५७

मुळशी -- ७६३९ -- ४३.८६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com