Pune APMC : पुणे बाजार समिती प्रशासक मधुकांत गरड यांची बदली

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांची पणन उपसंचालकपदी बदली करण्यात आली आहे.
Pune APMC
Pune APMCAgrowon

Pune APMC News पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांची पणन उपसंचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आर. एस. धोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बाजार समितीमधील डाळिंब यार्डाच्या नावाखाली काही निवडक आडत्यांना शिवनेरी या हमरस्त्यावरील भूखंड वाटप प्रकरण भोवले असल्याची चर्चा बाजार आवारात आहे.

Pune APMC
Pune APMC : पालेभाज्या विक्रीची जागा बदलू नये

गरड यांनी काही निवडक आडत्यांना डाळिंब यार्डासाठी भूखंड वाटपाची प्रक्रिया राबविली होती.

ही प्रक्रिया राबविताना पणन संचालक, जिल्हा उपनिबंधक, पुणे महानगर पालिका आदी वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता भूखंड वाटप केले होते. हे प्रकरण माध्यमांनी समोर आणल्यानंतर पणन संचालकांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.

यानंतर झालेल्या घडामोडींनतर गरड यांच्या बदलीची चर्चा बाजार आवारात होती.

Pune APMC
APMC, Pune : शंभर कोटींचा भूखंड अडत्यांच्या देण्याचा घाट

दरम्यान भूखंड वाटपप्रकरणी चौकशी सुरू झाल्यानंतर पुणे बाजार समितीने डाळिंब यार्डासाठी केलेल्या भूखंड वाटपाला मान्यतेचा प्रस्ताव गुरुवारी (ता. २) पणन संचालकांना पाठविण्यात आल्याचे समजते.

तर याचदिवशी संध्याकाळी गरड यांच्या बदलीचे आदेश मंत्रालयातून निघाले. यामुळे काही निवडक आडत्यांचे डाळिंब यार्डचे स्वप्न भंगल्याची चर्चा सध्या बाजार आवारात आहे.

जाहीर लिलावाने भूखंड वाटप होण्याची शक्यता

पुणे बाजार समितीने डाळिंब यार्डासाठी भूखंड वाटप केलेल्या प्रक्रियेला मान्यतेसाठी प्रस्ताव पणन संचालकांना सादर केला आहे.

मात्र हा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेकडून मान्यता घेऊन या जागेचा जाहीर लिलाव करून, बाजार समितीला जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे या दृष्टीने कार्यवाही करावी अशा सूचनांसह पुर्नप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पणनद्वारे केल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

डीडीआर मिलिंद सोबळे यांची बदली

जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबळे यांची बदली सहकार आयुक्तालयात झाली असून, त्यांच्या जागी कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोबळे यांच्याकडे पुणे बाजार समितीमधील डाळिंब यार्डासाठी करण्यात आलेल्या भूखंड वाटपाच्या चौकशीचे प्रकरण होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com