Guava Cake : पुरंदर पेरूचा केक बाजारात

पुण्यातील प्रसिद्ध कयानी बेकरी करणार उत्पादन
Guava Cake
Guava Cake Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः शेतीमालाच्या मूल्यवर्धनातून (Value Addition) फळांना चांगले दर मिळण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पुरंदर हायलँड्स शेतकरी उत्पादक कंपनी आणि पुण्यातील प्रसिद्ध कयानी बेकरीद्वारे लाल पेरूचा ‘स्प्रेड’ सह ‘पुरंदर पेरू केक’ (Guava Spread and Cake) सादर केला आहे. यामुळे पेरू पासून केक देखील तयार होणार आहे. परिणामी पेरूच्या मूल्यवर्धनातून शेतकऱ्यांना चांगले दर मिळणे शक्य होणार आहे.

Guava Cake
Cotton Production: कापूस उत्पादन यंदा ३७५ लाख गाठींवर पोचणार?

या बाबतची माहिती कंपनीचे अध्यक्ष रोहन उरसळ यांनी दिली. ते म्हणाले,‘‘शेतकऱ्यांनी पिकविलेल्या अंजीर, सीताफळ, पेरू वाणांना बाहेरील बाजारपेठेत मोठी मागणी असते. त्यामुळे पुरंदरचा रत्नदीप वाणाचा लाल पेरू निवडून त्यापासून हा ‘ब्रेड स्प्रेड’ तयार केला. विविध बागांमध्ये पेरू काढणीच्या वेळी कंपनी शेतकऱ्यांकडून पेरू खरेदी करते. बाजारपेठेत नेहमीच उत्तम दर्जाची विक्री केली जाते. प्रतवारीत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकात मोडणारे पेरू आम्ही मिळवतो. त्यातून कमी भावात जाणारा माल प्रक्रियेत वापरात येतानाच शेतकऱ्याला जादाचे पैसे मिळतात. पेरुवरील प्रक्रियेसाठी गर वेगळा करून त्याचा लगदा करतो आणि उणे २० अंशांवर साठवतो. ‘स्प्रेड’साठी आम्ही कंपनीचीच एक खास रेसिपी विकसित केली आहे. ज्यामुळे ती बाजारात उपलब्ध असलेल्या इतर ‘स्प्रेड्स’पेक्षा वेगळी आहे.’’

‘‘या ‘स्प्रेड’पासून केक किंवा ब्रेड बनविता येईल का? याबाबत आम्ही पुण्यातील प्रसिद्ध कयानी बेकरीचे संचालक रूस्तम कयानी यांच्यासोबत चर्चा करत प्रस्ताव दिला. त्यांनी देखील तो मान्य करत नावीन्यपूर्ण उत्पादन आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. बाजारात नव्यानेच पेरू केक सादर करण्यात यश आले आहे,’’ असेही उरसळ यांनी सांगितले.
----

Guava Cake
Sugarcane : ऊस दराचा प्रश्न आणि वस्तुस्थिती

पुरंदरमधील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतीमालाच्या रास्त भावासाठी, रोजगार वाढीसाठी चांगला प्रयत्न केला. प्रक्रिया प्रकल्प केला. आम्हाला या शेतकऱ्यांची प्रकिया उत्पादने तसेच त्याचा उपयोग करून नव्या उत्पादनाद्वारे प्रसार करायला आवडेल.
- रुस्तम कयानी, कयानी बेकरी, पुणे.

पेरू उत्पादक शेतकऱ्यांना मूल्यवर्धनातून पेरूला चांगले दर मिळतील. अंजीर ज्यूस व बाकी फळांवर व भाजीपाल्यावर प्रक्रिया करण्याचे प्रयोग कंपनीने हाती घेतले आहेत. त्याला यश मिळत आहे.
- रोहन उरसळ, अध्यक्ष : पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक कंपनी.

दृष्टिक्षेपात...
- ‘अंजीर स्प्रेड’नंतर ‘पेरू स्प्रेड’ बाजारात उतरवून केक लाँच
- चव, टिकवण क्षमता, पोषकता आदींची प्रयोगशाळेत तपासणी
- ‘पेरू स्प्रेड’मध्ये पल्पचे प्रमाण ७५ टक्के
- कृत्रिम रंगद्रव्ये आणि चवींचा समावेश नाही
- आरोग्यास पोषक व्हिटॅमिन सी, कॅलशियम, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशिअम घटक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com