E - pik Pahani : रब्बीची ५० हजार हेक्टरची ई-पीक नोंदणी

परभणी जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ७० हजार ७९८ हेक्टर असताना शुक्रवार (ता. १३) पर्यंत ३ लाख ४ हजार २३२ हेक्टरवर (११२.३५ टक्के) पेरणी झाली.
E - pik Pahani
E - pik Pahani Agrowon

परभणी ः Rabbi Season : यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात परभणी जिल्ह्यात ३ लाख ४ हजार २३२.३८ हेक्टर पेरणी झाली आहे. त्यापैकी ५० हजार २३१.१६ हेक्टर (१६.५१ टक्के) क्षेत्राची ई पीक पाहणी नोंदणी झाली आहे.

अजून २ लाख ५४ हजार १.२२ हेक्टरवरील ई-पीकपाहणी (E- pik pahani) नोंदणी शिल्लक आहे. अनेक गावशिवारात इंटरनेट कनेक्टीव्हटीचा अभाव, सर्व्हर डाऊनची समस्यांमुळे ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.

अनेक तलाठ्यांना या कामात फारसे स्वारस्य दिसत नाही. त्यामुळे तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणी रखडत चालली आली आहे. परिणामी शेतकऱ्यांना चालू वर्षीच्या शेती पिकांचा पेरा तसेच फळपीकांची लागवडीची नोंद असलेला अद्ययावत सात-बारा उतारा वेळेवर मिळणे दुरापस्त झाले आहे.

परभणी जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ७० हजार ७९८ हेक्टर असताना शुक्रवार (ता. १३) पर्यंत ३ लाख ४ हजार २३२ हेक्टरवर (११२.३५ टक्के) पेरणी झाली. त्यापैकी ५० हजार २३१.१६ हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी झाली आहे.

गतवर्षी (२०२१-२२) रब्बीतील २ लाख ७१ हजार १४२ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ५१ हजार ९११.५२ हेक्टर(१९.१५ टक्के) क्षेत्राची ई-पीक पाहणी झाली होती.

यंदाच्या खरिपातील ५ लाख ७६ हजार ६४३.५२ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ४ लाख ४७ हजार २७८.५३ हेक्टर (८८.११ टक्के) ई पीक पाहणी झाली. गतवर्षी (२०२१-२२) खरिपात ५ लाख ५० हजार हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी १ लाख ८६ हजार ७२.७८ हेक्टर (३६.८५ टक्के) ई-पीक पाहणी झाली होती.

E - pik Pahani
Rabbi Season : रब्बीची पेरणी ९० टक्क्यांवर

तलाठी स्तरावर उदासीनता...

महसूल, कृषी, ग्रामविकास विभागांनी पुरेशी जनजागृती न केल्यामुळे असंख्य शेतकरी या ई-पीक पाहणी बद्दल अनभिज्ञ आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी खातेदारांनी ई-पीक केलेली दिसत नाही.

शेतकरी स्तरावरील ई-पीक झाल्यानंतर तलाठ्यांनी मंजुरी देऊन अद्ययावत पीक पेरा असलेला सात बारा देणे आवश्यक असताना अनेक तलाठी या कामात कमालीची उदासीनता दाखवत आहेत.

संबंधित पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र आणि पेरणी क्षेत्र याबाबत ई पीक यंत्रणेमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील नोंदीनुसार खरीप आणि रब्बी हंगामात प्रत्यक्ष पेरणी केलेल्या संपूर्ण क्षेत्राची ई-पाहणी झाल्याचे दिसत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com