Rabi Crop Competition : पीक स्पर्धेला तुरळक प्रतिसाद

शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामाशी निगडीत असलेल्या या स्पर्धेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यास कृषी विभाग माघारला आहे.
Pik Spardha
Pik SpardhaAgrowon

वर्धा : वाढते तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांतील (Farmer) जिज्ञासू वृत्ती वृद्धींगत व्हावी याकरिता शासनाकडून पीक स्पर्धेचे (Rabi crop Competition आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत सहभागी होत विजयी ठरणाऱ्या शेतकऱ्यांना पारितोषिकही देण्यात येते.

शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामाशी निगडीत असलेल्या या स्पर्धेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यास कृषी विभाग (Agriculture Department) माघारला आहे. या स्पर्धेच्या जनजागृती अभावी जिल्ह्यातील केवळ २०० शेतकऱ्यांनीच या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.

जिल्ह्यात साधारणतः गहू आणि हरभरा या पिकांचा समावेश आहे. यात आदिवासी आणि सर्वसाधारण अशा दोन गटांत नोंदणी करायची आहे.

यात सहभागासाठी कोणत्याही पद्धतीचे शुल्क नाही. यामुळे या स्पर्धेत शेतकऱ्यांचा सहभाग अधिकाधिक असणे अपेक्षित आहे. असे असताना निव्वळ कृषी विभागाचा हलगर्जीपणा आणि वेळकाढू धोरणामुळे हा स्पर्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यात दोन लाख २० हजार शेतकरी संख्या आहे. साधारण चार लाख ५२ हजा ३०२ हेक्टर क्षेत्र विविध पिकांखाली आहे. खरीपानंतर रब्बी हंगामासाठी ७१ हजार २९३ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली.

यात ज्वारी, गहु, मका आदी तृणधान्य २४ हजार ४०२ हेक्टरवर तर चणा ४६ हजार ८२४ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. गळित धान्यात करडयी, रब्बी तीळ, जवस सूर्यफूल आदी ६५ हेक्टरवर आहे.

अन्नधान्यामध्ये गव्हासाठी ७१ बजार २२७ .५१ हेक्टर क्षेत्र निर्धारीत आहे. असे असताना केवळ २०० शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविणे कृषी विभागाल विचार करण्यास बाध्य करणारी गोष्ट ठरते.

Pik Spardha
Maize Rate Today : मक्याला १३ जानेवारीला किती दर मिळाला?

बदलाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही

यापूर्वी शेतकऱ्याला सर्वोच्च पारितोषिक मिळवण्यासाठी शेतात तीन वर्षे सातत्याने एकच पीक घ्यावे लागत होते. मात्र नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास उत्पादकतेतील घट शेतकऱ्यांना नाउमेद करते.

या बाबी टाळण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमुलाग्र बदल करत एकाच वर्षात स्पर्धा घेण्याचा निर्णय झाला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com