Crop Management : कडोशी येथे महिलांच्या शेतीशाळेत रब्बी पीक व्यवस्थापनाचे धडे

शेती क्षेत्रात महिलांना सुद्धा आधुनिक शेतीविषयी माहिती व्हावी, कृषिक्षेत्र, संलग्न क्षेत्र व कृषी उत्पादनात महिलांची मदत, सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
Rabi Crop Management
Rabi Crop ManagementAgrowon

रब्बीला फायदा झालेला आहे. रब्बीत शेतकऱ्यांचे उत्पादन (Rabi Crop Production) वाढावे या हेतूने शेतीशाळा घेण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कृषी विभाग (Agriculture Department), आत्मा यंत्रणा, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जात आहे. शेतीत महिलांचे (Women Contribution In Agriculture) असलेले अनन्यसाधारण योगदान पाहता बाळापूर तालुक्यातील कडोशी येथे महिलांसाठी शेतीशाळा घेण्यात आली.

Rabi Crop Management
Rabi Crop Insurance : रब्बी पिकांना मिळणार विमा कवच

शेती क्षेत्रात महिलांना सुद्धा आधुनिक शेतीविषयी माहिती व्हावी, कृषिक्षेत्र, संलग्न क्षेत्र व कृषी उत्पादनात महिलांची मदत, सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जमीन तयार करणे ते प्रक्रिया, मूल्यवर्धन घटकामध्ये महिलांचा यशस्वी व मोलाचा सहभाग आहे.

Rabi Crop Management
Rabi Crop Insurance : गेल्या रब्बीसाठीचा १८ कोटी ७८ लाखांचा पीकविमा मंजूर

हे लक्षात घेता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, प्रकल्प संचालक (आत्मा) आरिफ शाह, तालुका कृषी अधिकारी नंदकिशोर माने यांच्या मार्गदर्शनात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागाच्या वतीने हरभरा पिकाची महिलाची शेतीशाळा बाळापूर तालुक्यातील कडोशी येथे घेण्यात आली.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. गजानन लांडे, खादीग्राम मंडळाचे आर. एम. बिलबिले, आत्माचे तालुका तंत्र अधिकारी व्ही. एम. शेगोकार उपस्थित होते. यावेळी शेतीशाळेमध्ये हरभरा उत्पादक महिलांना डॉ. लांडे यांनी रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे एकात्मिक पद्धतीने कीड व रोग व्यवस्थापन, घाटे अळीचे नियंत्रण, निरीक्षण घेण्याच्या पद्धती, फेरोमोन ट्रॅप व पक्षी थांबे लावल्यास होणारे फायदे याविषयी तांत्रिक माहिती दिली.

बिलबिले यांनी महिला शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाबाबत आणि खादीग्राम उद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना विषयी माहिती दिली. श्री.शेगोकार यांनी उपस्थित महिला शेतकऱ्यांना निंबोळी अर्काचे फायदे तसेच फवारणी करताना घ्यावयाची काळजीची माहिती दिली. शेतीशाळा यशस्वी होण्यासाठी कृषी सहाय्यिका वर्षा वसतकार, कृषिमित्र गोपाल गायकी, दीपक वडतकार यांनी पुढाकार घेतला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com