
औरंगाबाद : मराठवाड्यात औरंगाबाद व लातूर कृषी विभागांतर्गत यंदा रब्बी हंगामासाठी (Rabi Season) सर्वसाधारण क्षेत्र २१ लाख ५ हजार १११ हेक्टर आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात २१ लाख ४५ हजार ५९६ हेक्टरवर रब्बीची पेरणी (Rabi Sowing) झाली आहे. त्यामध्ये लातूर कृषी विभागात सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन १०७ टक्के तर औरंगाबाद विभागात ९२.७० टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.
लातूर कृषी विभागातील उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व औरंगाबाद कृषी विभागातील औरंगाबाद, बीड या पाच जिल्ह्यांमध्ये अजूनही अपेक्षित रब्बीची पेरणी झालेली नाही. औरंगाबाद कृषी विभागातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामासाठी सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ४१ हजार १८० हेक्टर आहे.
त्या तुलनेत प्रत्यक्षात ६ लाख ८७ हजार ९९ हेक्टरवर अर्थात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९२.७० टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. लातूर कृषी विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यात रब्बीसाठीचे सर्वसाधारण क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर आहे. प्रत्यक्षात सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन १०७ टक्के म्हणजे १४ लाख ५८ हजार ४९७ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.
१३ लाख १४ हजार हेक्टरवर हरभरा
यंदाच्या रब्बी हंगामासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १० लाख २२ हजार ९६५ हेक्टर इतके आहे. त्यामध्ये औरंगाबाद विभागातील २ लाख ३६ हजार ८४१ हेक्टर व लातूर विभागातील ७ लाख ८६ हजार १२४ हेक्टर हक्षेत्राचा समावेश आहे. १५ डिसेंबरअखेरपर्यंत आठही जिल्ह्यांत १३ लाख १४ हजार २१ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद विभागातील तीन जिल्ह्यांत २ लाख ८६ हजार ३२९ हेक्टर तर लातूर विभागातील पाच जिल्ह्यांत १० लाख २७ हजार ६९२ हेक्टर हरभऱ्याच्या क्षेत्राचा समावेश आहे.
जिल्हानिहाय सर्वसाधारण व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
जिल्हा सर्वसाधारण प्रत्यक्ष टक्केवारी
औरंगाबाद १९०९३५ १४५३३३ ७६.१२
जालना २१७८९२ २२४७१९ १०३.१३
बीड ३३२३५३ ३१७०४६ ९५.३९
लातूर २८०४३७ ३२११७४ ११५
उस्मानाबाद ४१११७२ ३९८०३३ ९७
नांदेड २२४६३४ ३२३६०९ १४४
परभणी २७०७९५ २६६१३३ ९८
हिंगोली १७६८९३ १४९५४८ ८५
४ लाख ६७ हजार हेक्टरवर रब्बी ज्वारी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा रब्बीज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख ७३ हजार ९९५ हेक्टर निश्चित आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात ४ लाख ६७ हजार ८९१ हेक्टरवर म्हणजे जवळपास ६९ टक्के क्षेत्रावरच रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.